Police Commemoration Day 2020: PM नरेंद्र मोदी, अमित शाह समवेत मुंबई पोलिस यांची शहीद पोलिसांना आदरांजली!

खास संचलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

Police Commemoration Day 2020 | Photo Credits: Twitter

Police Commemoration Day 2020: भारतामध्ये 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन  (Police Commemoration Day) म्हणून साजरा केला आहे. या दिवसाचं औचित्य साधून देशभरात आपलं कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांना आदरांजली अर्पण केली जाते. सध्या कोविड संकटकाळामध्ये कोविड योद्धा म्हणून फ्रंटलाईनवर उभ्या असलेल्या अनेक पोलिसांचा मृत्यू जीवघेण्या कोरोना संसर्गामुळे झाला आहे. दरम्यान आज त्यांच्याप्रती असलेल्या आदरभावाला वाट मोकळी करून देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत राजकीय नेते, सामान्य जनतेने पोलिसांच्या सेवेला सलाम करत मृत पोलिसांप्रती श्रद्धांजली अर्पण केली आहे. Police Commemoration Day 2020 Images: भारतीय शहीद पोलिस स्मृतिदिन निमित्त WhatsApp, Facebook Status द्वारा आदरांजली अर्पण करण्यासाठी खास इमेजेस!

दरम्यान 21 ऑक्टॉबर 1959 साली लद्दाख मध्ये चीनी सैनिकांसोबत लढताना 10 केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना हौताम्य आलं. या वीर जवानांच्या शौर्याची दखल घेत त्यांची कर्तव्यनिष्ठा इतरांना प्रेरणादायी ठरावी याकरिता 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जाऊ लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

दिल्ली मध्ये आज सकाळी National Police Memorial वर पोलिसांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह पोहचले होते.

मुंबई पोलिस

महाराष्ट्र पोलिस

धीरज देशमुख 

महाराष्ट्रामध्येही आज पोलिस स्मृतिदिन याचं औचित्य साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खास संचलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.