Special Bus Services For Shiv Jayanti 2024: शिवभक्तांसाठी खुशखबर! शिवजयंतीनिमित्त PMPML विशेष बससेवा चालवणार; 'या' वेळेत धावणार बस
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार 17 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवभक्तांच्या सोयीसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
Special Bus Services For Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे दरवर्षी शिवजयंती (Shiv Jayanti 2024) मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. या दिवशी राज्यभरातून मोठा संख्येने शिवभक्त शिवनेरीवर येतात. या प्रसंगी, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने 17 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
शिवजयंतीसाठी विशेष बससेवा -
- भोसरी ते जुन्नर या बस सुटण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत: सकाळी 05.30, 07.00, 08.30, 10.00, 01.30, 03.00, 04.30, 06.00.
- जुन्नर ते भोसरी बस सुटण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत: 09.30, 11.00, 12.30, 02.00, 05.30, 07.00, 08.30, 10.00
दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. जेथे सर्व भक्त एकत्र जमतात आणि हा शुभ सोहळा मोठ्या उत्सवात साजरा करतात. शिवभक्तांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल दरवर्षी विशेष सेवा चालवत असते. यंदा देखील पीएमपीएमएलने प्रवाशांसाठी विशेष बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Shivneri Festival 2024: शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा'चे आयोजन; संगीत, नृत्य, नाट्य, गिर्यारोहणसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, पीएमपीएमएलने प्रवाशांना उपलब्ध सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे शिवजयंतीच्या दिवशी वाहतूक कोंडी कमी करता येईल.