Republic Day 2021: भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरामध्ये मोहक तिरंगी आरास (View Pics)
गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन सुरू असताना पंढरपूरचं विठ्ठल -रूक्मिणी मंदिर (Pandharpur Vitthal Rukmini Mandir) देखील सजलं आहे.
भारतामध्ये आज (26 जानेवारी) 72 वा प्रजासत्ताक दिवस (Indian Republic Day) साजरा केला जात आहे. सध्या कोविड 19 मुळे त्याच्या सेलिब्रेशन वर बंधन असलं तरीही नागरिकांना पुरेशी काळजी घेत हा राष्ट्रीय सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन सुरू असताना पंढरपूरचं विठ्ठल -रूक्मिणी मंदिर (Pandharpur Vitthal Rukmini Mandir) देखील सजलं आहे. पंढरपूर मंदिरामध्ये आज तिरंग्यामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर विठ्ठल रूक्मिणीच्या अंगावर आज तिरंगी उपरणं देखील आहे.
दरम्यान महत्त्वाचे सण, एकादशी निमित्त आकर्षक फुलांनी पंढरपूरचं मंदिर अनेकदा सजलेले पाहिलं आहे. आजही मंदिरात भक्तिभावाच्या वातारणासोबतच देशभक्तीपर वातावरण पहायला मिळालं आहे. विठू मंदिराचा गाभारा देखील आज तिरंगी फुलांनी सजला आहे. नक्की वाचा: Republic Day 2021 Rangoli Designs: प्रजासत्ताक दिनानिमित्त काढा 'या'सोप्या आकर्षक आणि Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स .
विठ्ठ्ल-रूक्मिणी मंदिरामध्ये तिरंगी रोषणाई
भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली मध्ये आज राजपथावर अवघ्या 25 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार आहे. यंदा परदेशी पाहुण्यांशिवायच रिपब्लिक डे परेड सोहळा पार पडणार आहे.