Ashadi Ekadashi 2021 Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीचे घरबसल्या मिळणार दर्शन
Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा कडेकोत बंदोबस्त आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी साजरी करावी लागत आहे.
Ashadi Ekadashi Pandharpur Live Darshan: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा कडेकोत बंदोबस्त आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी साजरी करावी लागत आहे. यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून मानाच्या 10 पालख्यांना आणि त्यासोबत 400 वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नसून भाविकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे अन्य भाविकांना पंढरपूरात प्रवेश नसला तरी, त्यांना घरबसल्या विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील थेट सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर त्याची खास सोय करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार, आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालखी सोहळ्यात येणाऱ्या 400 भाविकांना विठुरायाचे दर्शन मिळणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बस द्वारा येणार्या पालख्या सोमवारी 'वाखरी' येथे दाखल झाल्या आहेत. संताच्या भेटी घेऊन त्या पुढे पंढरपूर कडे रवाना होतील. वाखरी ते इसबावी मधील विसावा मंदिर या 3 किमीच्या परिसरात 40 वारकरी पायी वारी करतील. तर, इसबावी ते पंढरपूर पायी वारीसाठी केवळ 20 वारकर्यांना परवानगी असेल. अन्य 380 वारकरी मठाकडे परतणार आहेत. हे देखील वाचा- Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशी निमित्त मराठी मेसेज, Quotes, WhatsApp Status, Wishes, HD Photos पाठवून साजरा करा विठुरायाचा गजर
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-
• संकेतस्थळ- vitthalrukminimandir.org/onlineDarshan
• गुगल प्ले स्टोअरवरील ॲप- shreevitthalrukmnilive Darshan
• जिओ टीव्ही- जिओ दर्शन
• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते.