Gudi Padwa Shubh Muhurat 2023: गुढीपाडवा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल? शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या
मान्यतेनुसार या दिवशी घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत, त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. गुढीपाडव्याची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊयात...
Gudi Padwa Shubh Muhurat 2023: चैत्र महिन्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यातीलच महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजेचं गुढीपाडवा. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचा सण अत्यं महत्वाचा आहे. कारण, या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि हा दिवस ब्रह्मदेवाची पूजा करण्यासाठी समर्पित मानला जातो. तसेच या दिवसापासून नवरात्रीची सुरुवात होते आणि प्रत्येक घरात माँ दुर्गा वास करते. याशिवाय शेतकरी या दिवशी नवीन पिके घेतात. हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष स्थान आहे. मान्यतेनुसार या दिवशी घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत, त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. गुढीपाडव्याची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊयात...(हेही वाचा - Gudi Padwa 2023 Rangoli Designs: गुढीपाडव्याला काढता येतील अशा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)
गुढीपाडवा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या -
- चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा प्रारंभ: रात्री 09.22 पासून (21 मार्च 2023 मंगळवार)
- चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा समाप्ती: संध्याकाळी 06.50 पासून (22 मार्च 2023 बुधवार)
- उदय तिथीनुसार, 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाईल.
- गुढी पाडवा पूजा मुहूर्त: सकाळी 06.29 AM ते सकाळी 07.39 AM (22 मार्च 2023)
गुढी पाडवा पूजा पद्धत-
महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची प्राचीन परंपरा आहे. या विशेष दिवशी घराच्या मुख्य गेटवर एका खांबावर पितळेचे भांडे उलटे ठेवले जाते आणि त्यावर लाल, भगवे आणि पिवळे रेशमी कापड बांधले जाते. त्यानंतर गुढीला फुलांनी सजवून पूजा केली जाते. यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घराच्या मुख्य गेटला तोरण बनवून सजवतात आणि घराच्या एका भागात गुढी उभारतात. यासोबतच या दिवशी ब्रह्माजींचीही नियमानुसार पूजा केली जाते.