Savitribai Phule Quotes In Marathi: सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे शेअर करा क्रांतीज्योती सावित्रीचे अनमोल विचार!
महिला सक्षमीकरणात अडथळा आणणाऱ्या हुंडा आणि इतर सामाजिक वाईट गोष्टींविरुद्धही त्यांनी लढा दिला. सावित्रीच्या विचारांचा वारसा आजही महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनमोल विचारांवर नजर टाकूयात.
Savitribai Phule Quotes In Marathi: सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) या महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय सुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवी होत्या. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि सर्वांना समान हक्क आणि संधी मिळाव्यात अशी मागणी केली. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका म्हणून गौरवल्या जातात.
सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळाही त्यांनी स्थापन केली. महिला सक्षमीकरणात अडथळा आणणाऱ्या हुंडा आणि इतर सामाजिक वाईट गोष्टींविरुद्धही त्यांनी लढा दिला. सावित्रीच्या विचारांचा वारसा आजही महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सावित्रीबाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनमोल विचारांवर नजर टाकूयात.
तुम्ही बकरी, गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दूध देता आणि तुम्हीच दलितांना साधं माणूसही समजत नाही…
- सावित्रीबाई फुले
माझ्या कविता वाचल्यावर जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रण सार्थकी लागले
– सावित्रीबाई फुले
जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते
– सावित्रीबाई फुले
शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे तुम्ही जग बदलण्यासाठी वापरू शकता
– सावित्रीबाई फुले
विचार कसा करायचा हे शिकायचे असेल तर पुस्तके वाचा. अभिनय कसा करायचा हे शिकायचे असेल तर अभिनय पहा
– सावित्रीबाई फुले
वयाच्या नऊव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. 1852 मध्ये, ब्रिटिश सरकारने फुले कुटुंबाला त्यांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल सन्मानित केले आणि सावित्रीबाईंना सर्वोत्तम शिक्षिका अशी ओळख दिली. 1855 मध्ये या जोडप्याने शेतकरी आणि मजुरांसाठी रात्रशाळा सुरू केली.