National Science Day 2025 Wishes In Marathi: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त Message, WhatsApp Status, Images द्वारे विज्ञानप्रेमींना द्या खास शुभेच्छा
या दिवशी तुम्ही आपल्या विज्ञानप्रेमी मित्र-मैत्रिणींना Message, WhatsApp Status, Images द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
National Science Day 2025 Wishes In Marathi: दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day 2025) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांनी 'रामन इफेक्ट' शोधला होता. यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही देण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिन पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1997 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून, हा दिवस दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा उद्देश महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांना त्यांच्या योगदानाबद्दल स्मरण करणे आहे. या दिवशी देशातील विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विज्ञाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. तथापी, या दिवशी तुम्ही आपल्या विज्ञानप्रेमी मित्र-मैत्रिणींना Message, WhatsApp Status, Images द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
सीव्ही रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. सी.व्ही. रमन यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.