Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs: गणेश चतुर्थीनिमित्त घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स (Watch Video)
आम्ही तुमच्यासाठी काही खास गणेश चतुर्थीनिमित्त काढायच्या खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत.
Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs: आज सर्व गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेकांनी आपल्या घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हिंदू धर्मात कोणत्याही सणाला रांगोळी काढण्याची परंपरा आहे. आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) निमित्त तुम्ही देखील गणरायाच्या स्वागतासाठी तुमच्या घर किंवा अंगणात सुंदर रांगोळी (Ganesh Chaturthi 2024 Rangoli Designs) काढू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही खास गणेश चतुर्थीनिमित्त काढायच्या खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत.
गणपतीच्या स्वागतासाठी तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. त्यासाठी तीन ते चार रंगीत फुलांच्या पाकळ्या वेगळ्या कराव्यात आणि मग त्या डिझाइनमध्ये मांडाव्यात. झेंडूची फुले ही गणपतीची आवडती मानली जातात, त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात गणपतीचे स्वागत करण्यासाठी झेंडूच्या फुलांनी रांगोळी काढू शकता, तसेच कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनसाठी गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता. (हेही वाचा - Ganesh Sthapana Muhurat 2024: 'या' शुभ मुहूर्तावर करा श्रीगणेशाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि पूजाविधी)
गणेश चतुर्थीनिमित्त घरासमोर, अंगणात काढा 'या' खास रांगोळी डिझाईन्स, पहा व्हिडिओ -
आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा होत आहे. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे जो भगवान गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करतात.