November 2020 Festivals Calendar: नोव्हेंबर महिन्यात यंदा दिवाळी, तुलसी विवाह ते अगदी त्रिपुरारी पौर्णिमेची धूम पहा सार्‍या सणांची यादी

यंदा नोव्हेंबर महिना हा सणांची मोठी रेलचेल घेऊन आला आहे. यंदा सणांचा राजा दिवाळीची धामधूम नोव्हेंबर महिन्यातच आहे.

November 2020 (Photo Credits: File Image)

आता आपण 2020 या ग्रेगेरियन वर्षाच्या शेवटाकडे आलो आहोत. यंदा नोव्हेंबर महिना हा सणांची मोठी रेलचेल घेऊन आला आहे. यंदा सणांचा राजा दिवाळीची (Diwali) धामधूम नोव्हेंबर महिन्यातच आहे. सौभाग्याचं लेणं जपण्यासाठी प्रामुख्याने उत्तर भारतीय महिला करत असलेल्या करवा चौथचा सण देखील नोव्हेंबर महिन्या मध्ये आहे. त्यामुळे हिंदू बांधवांसोबतच शीख धर्मीयांचे गुरू, गुरू नानक यांची जयंती (Guru Nanak Jayanti), ते अगदी तुलसी विवाह (Tulsi Vivah) कधी आहे याची देखील माहिती करून घ्या. म्हणजे सणांच्या निमित्ताने सुट्ट्या आणि इतर सेलिब्रेशनसाठी तुम्ही सज्ज व्हाल. दरम्यान यंदा सणांवर सर्वत्रच कोरोनाचं सावट असल्याने दिवाळी सारखा धामधुमीचा सण देखील अगदी साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यसाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचंही आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा घरच्या घरीच सन साजरे करताना कोणत्या सणाची कोणती तारीख आहे हे आताच पाहून ठेवा आणि सेलिब्रेशनची त्यानुसार तयारी करा. Diwali 2020 Dates: यंदा दिवाळी कधी आहे? वसूबारस, लक्ष्मीपुजन ते भाऊबीज 6 दिवसांच्या दीपोत्सवात कोणता सण कधी?

नोव्हेंबर 2020 मधील महत्त्वाचे सण कोणते?

करवा चौथ - 4 नोव्हेंबर 2020

संकष्टी चतुर्थी - 4 नोव्हेंबर 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी - 5 नोव्हेंबर 2020

रमा एकादशी -11 नोव्हेंबर 2020

वसूबारस - 12 नोव्हेंबर 2020

धनतेरस, यमदीपदान - 13 नोव्हेंबर 2020

नरक चतुर्दशी - 14 नोव्हेंबर 2020

लक्ष्मी पुजन - 14 नोव्हेंबर 2020

बालदिन - 14 नोव्हेंबर 2020

दिवाळी पाडवा - 16 नोव्हेंबर 2020

भाऊबीज - 16 नोव्हेंबर 2020

कार्तिकी एकादशी -26 नोव्हेंबर 2020

तुलसी विवाह प्रारंभ - 26 नोव्हेंबर 2020

त्रिपुरारी पौर्णिमा - 29 नोव्हेंबर 2020

गुरूनानक जयंती -30 नोव्हेंबर 2020

दिवाळी सारखा भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने सार्‍या धर्मीय नागरिकांमध्ये या महिन्यात मोठा उत्साह बघयला मिळणार आहे. पण केंद्र आणि राज्य सरकारकडून मात्र कोरोनाचं भान ठेवत, गर्दी टाळत यंदा सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील शक्य तेथे थेट भेट टाळत, गर्दी टाळत सेलिब्रेशन ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न करा.