New Year 2020: नववर्षात कोणते संकल्प करु शकता; पाहा काही भन्नाट आयडियाज
दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक लोकांचे काही खास संकल्प असतील.
New Year Resolution Ideas: नवीन वर्ष म्हटलं सर्वांची यादी बनते ती नवीन संकल्पांची आणि आपापसांत चर्चा रंगू लागतात. गेल्या वर्षी अर्ध्यावर सोडलेला संकल्प नवीन वर्षात पूर्ण करायचा असा प्रण घेणारे अनेकजण आपल्याला पाहायला मिळतात. नववर्षाचा संकल्प म्हणजे एखादी गोष्ट नवीन वर्षात करुन ती पूर्णत्वास नेणे. मात्र कधीही ती गोष्ट पूर्णत्वास जात नाही. अशा वेळी आपल्याला लाजल्यासारखे वाटते. 1 जानेवारीला सुरु करण्यात आलेला संकल्प 2 जानेवारीला संपुष्टात येतो. याच्या मागे बरीच कारणे असतात. मुख्यत: तुम्ही एखादा संकल्प मनापासून न केल्यामुळे किंवा तो संकल्पच तितका चांगला नसल्याने तो अर्धवट राहतो. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक लोकांचे काही खास संकल्प असतील.
तुम्हाला करता येण्यासारखे आणि तुमच्या बुद्धीला पटण्यासारखे संकल्पांच्या काही भन्नाट आयडियाज येथे पाहा
1. आठवड्यात एकदा नो मोबाईल डे
2. दररोज कमीत कमी 1 तास व्यायाम करणे
3. शीघ्रकोपींनी रागावर नियंत्रण ठेवणे
4. गृहिणींनी किंवा नोकरदार वर्गांनी वेळात वेळ काढून स्वत:ची आवड जोपासणे, स्वत:साठी लक्ष देणे New Year 2020 Dating Tips: नवीन वर्षात कुणाला डेट करायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी
5. महिन्याला एक तरी झाडं लावणार
6. दिवसाातून एकदा तरी माझ्यामुळे कोणाच्या तरी चेह-यावर हसू यावे यासाठी प्रयत्न करणार
7. फास्ट फूड व्हर्ज्य करता आले नाही तरी ते कमी खाण्याचा प्रयत्न करणार
8. सर्वांना फोन करुन सणाच्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार
9. महिन्यातून एकदा पिकनिक किंवा आउटिंगला जाणार
10. मित्र-मैत्रिणींसोबत घरच्यांनाही वेळ देणार
हे संकल्प करायला सोपे वाटत असले तरी ते पूर्ण करणे तितकेच अवघड आहे. मात्र यासाठी एक पाऊल पुढे टाकून प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. तसेच तुम्ही नवीन वर्षात कोणते नवीन संकल्प करणार आहात हेही आम्हाला लिहून कळवा.