Navratri Colours 2022 for 9 Days: 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?
हे रंग केवळ महिला त्यांच्यामधील एकजूट दर्शवण्यासाठी पाळतात. त्याचा देवीच्या सणावर कोणताही परिणाम अवलंबून नसतो.
Navratri Colours 2022 for 9 Days: शारदीय नवरात्रीची (Sharadiya Navratri) सुरूवात 26 सप्टेंबर पासून होणार आहे. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या नवरात्रीमध्ये महिला वर्गांमध्ये विशेष आकर्षण असतं ते म्हणजे नऊ रात्र नऊरंगांची. गणेशोत्सवाप्रमाणे तरूणाई आता नवरात्र देखील धूमधडाक्यामध्ये साजरी करण्यासाठी सज्ज होत आहे. कोरोनाचं संकट दूर सारून पुन्हा दोन वर्षांनी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल त्यामुळे यंदा या नवरात्री मध्ये तुम्हांला तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत या नवरंगांचं कलर- को कोर्डिनेशन करणार असेल तर पहा यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग आहे?
नवरात्री मधील दिवस आणि कोणत्या दिवशी कोणती माळ येते यावर दर नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे नऊ रंग ठरतात. यंदा पांढर्या रंगापासून सुरूवात होईल तर पिंक अर्थात गुलाबी रंगाने सांगता होणार आहे. हे देखील नक्की वाचा: Shardiya Navratri 2022 Date: 26 सप्टेंबरला घटस्थापना; जाणून यंदा नवरात्रीमध्ये ललिता पंचमी, महाअष्टमी चा दिवस कधी?
नवरात्री 2022 मधील नवरंग
प्रतिपदा पहिला दिवस - 26 सप्टेंबर - पांढरा
द्वितीया दुसरा दिवस - 27 सप्टेंबर- लाल
तृतीया तिसरा दिवस - 28 सप्टेंबर - रॉयल ब्लू
चतुर्थी चौथा दिवस - 29 सप्टेंबर - पिवळा
पंचमी पाचवा दिवस - 30 सप्टेंबर - हिरवा
षष्ठी सहावा दिवस - 1 ऑक्टोबर - राखाडी
सप्तमी सातवा दिवस - 2 ऑक्टोबर - नारंगी
अष्टमी आठवा दिवस - 3 ऑक्टोबर - मोरपिसी
नवमी नववा दिवस - 4 ऑक्टोबर - गुलाबी
दरम्यान नवरात्रीचे नऊ रंग आणि शारदीय नवरात्रीच्या प्रथा, परंपरेचे कोणताच थेट संबंध नाही. हे रंग केवळ महिला त्यांच्यामधील एकजूट दर्शवण्यासाठी पाळतात. त्याचा देवीच्या सणावर कोणताही परिणाम अवलंबून नसतो.