Navratri 2021 Mehndi Designs: नवरात्रीच्या उत्सवासाठी हातावर काढा 'या' सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिझाइन
हिंदू धर्मात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या या आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाईन्स आणल्या आहेत.
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यावेळी नवरात्री गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. नवरात्री हा नऊ रात्रीचा सण आहे जो भारतातील सर्व हिंदूं साजरा करतात. हा सण भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि या सणाला खूप मान्यता आहे. प्रत्येकजण या सणाची वाट पाहतो. भारतातील इतर राज्यांपेक्षा गुजरातमधील लोक या सणाचा अधिक आनंद घेतात. या दरम्यान, मुली आणि स्त्रिया वेषभूषा करतात आणि गरबा आणि दांडिया खेळतात. (Ghatasthapana Wishes In Marathi: घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत आप्तांच्या दिवसाची करा मंगलमय सुरूवात )
सण कोणताही असो, महिलांना मेहंदी (Navratri Mehndi) काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. हिंदू धर्मात मेहंदी काढणे शुभ मानले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या या आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाईन्स आणल्या आहेत, ज्या तुमच्या सौंदर्यात भर घालतील.जर तुम्हीही या नवरात्रोत्सवावर अनोखी मेहंदी काढण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम मेहंदी डिझाईन्स दाखवू ज्या काढायला कमी वेळ लागेल.
नवरात्री विशेष मेहंदी
देवीची मेहंदी
गरबा मेहंदी
दसरा मेहंदी
शारदीय नवरात्रीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेहंदी काढून हातांचे सौंदर्य वाढवू शकता. यासह, कोणीही देवी मातेचे पूजन शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या मेहंदी डिझाईन्स नक्कीच आवडल्या असतील.