Navratri 2020 Songs: नवरात्री उत्सव साजरी करण्यासाठी या गाण्यांनी करा दिवसाची सुरुवात आणि देवी मातेच्या भक्तीत व्हा लीन!

त्याचबरोबर आपल्या कुटूंबियांसोबत घरात रासगरबा देखील करु शकता.

Navratri Songs (Photo Credits: Wikimedia Commons)

Navratri Special Songs: देवीचा प्रिय भक्ती देवीच्या आगमनाची वर्षभरापासून ज्या दिवसाची वाट पाहत असतो तो नवरात्रीचा (Navratri) दिवस आज अखेर उजाडला. आज देवीचे घट स्थापन करून त्याची पूजा केली जाते. देवीची मूर्ती घरी आणली जाते आणि पुढील 9 दिवस तिची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. आजचा हा नवरात्रीचा दिवस त्या प्रत्येक भक्तासाठी तसेच रास गरबा (Ras Garba) रसिकांसाठी तसा विशेष असतो. मात्र यंदा संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे लोकांनी घरात राहूनच हा सण साजरा करण्याचे ठरवले आहे. मात्र त्यासाठी घरात चैतन्यमय वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही सुंदर अशी देवी मातेची गाणी लावून हा सण साजरा करू शकतो.

घरच्या घरी अगदी साध्या सरळ पद्धतीने देवीचा छान गाणी लावून तुम्ही देवीच्या भक्तीत लीन होऊ शकता. त्याचबरोबर आपल्या कुटूंबियांसोबत घरात रासगरबा देखील करु शकता.

घरात असे प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी ही गाणी अवश्य ऐका.

आईचा जोगवा मागेन

दुर्गे दुर्गट भारी

अंबे कृपा करी

Happy Navratri 2020 Wishes in Marathi: घटस्थापनेच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन दणक्यात साजरी करा यंदाची नवरात्र!

करुया उदो उदो अंबाबाईचा

माय भवानी

देवीला आपला प्रत्येक भक्त हा प्रिय असतो. त्यामुळे त्याच्यावर आलेले संकट हरण करण्यासाठी ती त्याच्या मदतीला धावून येते. अशा देवीचे गुणगान करावे तितके कमीच आहे. त्यामुळे अशा या नवदुर्गेचा पुढील 9 दिवस जागर घालण्यासाठी ही गाणी नक्की ऐका.