National Pollution Control Day 2020 Quotes: पर्यावरणप्रेमी, मित्रमंडळींना प्रदूषण रोखण्यासाठी प्रेरणा देणारी खास घोषवाक्यं
त्यासाठी आजचा नॅशनल पॉल्युशन कंट्रोल डे महत्त्वाचा आहे.
दरावर्षी 2 डिसेंबर हा दिवस नॅशनल पोल्युशन कंट्रोल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत पर्यावरणासोबत मानवी आयुष्य, हवेची गुणवत्ता, समुद्र यांना नुकसानकारक ठरणार्या प्रदूषकांना कमी करण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात. दरम्यान हा दिवस 'भोपाळ गॅस गळती' दुर्घटनेच्या स्मरणार्थ देखील पाळला जातो. 2 डिसेंबर 1984 दिवशी भोपाळ गॅस गळतीची भयंकर घटना घडली होती. भोपाळ वायू दुर्घटना, 20 व्या शतकातील सर्वात मोठा औद्योगिक अपघात: UN Report.
भोपाळ गॅस गळती दुर्घटना ही जगातील सर्वात गंभीर industrial pollution disasters समजली जाते. आज या दुर्घटनेची 36 वी वर्षपूर्ती आहे. पण अशा घटना भविष्यामध्ये घडू नयेत म्हणून समाजात पर्यावरणाबाबत सजगता निर्मण करण्याची गरज आहे त्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना, पर्यावरणप्रेमींना याविषयी खास Quotes, HD Images नक्की शेअर करा.
वायू प्रदुषणाच्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती करणं आता अत्यावश्यक बनत चाललं आहे. त्यासाठी आजचा नॅशनल पॉल्युशन कंट्रोल डे महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य पोर्टलच्या माहितीनुसार, प्रतिवर्षी 7 मिलियन लोकांना वायू प्रदुषणामुळे आपला जीव गमवावा लागतो. जागतिक पातळीवर सुमारे 10 पैकी 9 जणांपर्यंत आज शुद्ध हवा पोहचत नाही. वायू प्रदुषणामधून काही विषारी , धोकादायक प्रदुषक आपल्या हृद्य, मेंदू, फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करत आहेत.