IPL Auction 2025 Live

National Mathematics Day 2023 Quotes: राष्ट्रीय गणित दिन निमित्त जाणून घ्या जगभरातील गणितज्ञांचे खास विचार

भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त ( Srinivasa Iyengar Ramanujan Birth Anniversary) दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन (National Mathematics Day) पाळला जातो

Mathematics l purpose (Photo Credits: Pixabay)

भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त ( Srinivasa Iyengar Ramanujan Birth Anniversary) दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन (National Mathematics Day) पाळला जातो. आपल्या जीवनाला आकार देणारे एक मूलभूत विज्ञान म्हणून गणिताचा सखोल प्रभाव असतो. म्हणूनच हा दिवस मानवी अस्तित्वाच्या विविध पैलूंमध्ये गणिताच्या तत्त्वांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सुरुवातीच्या शिक्षणात शिकलेल्या बेरीज आणि वजाबाकीच्या प्राथमिक कौशल्यांपासून ते निसर्गाने निर्माण केलेल्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यापर्यंत, गणित हा सृष्टीचा आधारशिला मानला जातो. अशा या विशेष दिवसानिमित्त जाणून खास कोट्स. (National Mathematics Day 2023 Quotes)

गणिताबद्दल जगभरातील मान्यवरांनी काय म्हटले?

गणितज्ञ शकुंतला देवी यांनी समर्पकपणे केलेल्या व्यकेनुसार, "गणित म्हणजे काय? निसर्गाने निर्माण केलेली कोडी सोडवण्याचा हा केवळ पद्धतशीर प्रयत्न आहे." स्वयंपाकी आणि शेतकरी, सुतार, यांत्रिकी, दुकानदार, डॉक्टर, अभियंता, शास्त्रज्ञ, संगीतकार आणि जादूगार अशा व्यक्तींच्या विशेष कार्यावर देखील गणिताचा प्रभाव कायम राहिला आहे. गणिताचे महत्त्व विविध व्यवसायांमध्ये पसरलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात गणिताची सर्वव्यापीता आणि अपरिहार्यता ओळखून, या विषयाबद्दल जागरूकता आणि प्रशंसा वाढवण्यासाठी राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी साजरा केला जातो.