National Mathematics Day 2020: गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त का साजरा केला जातो 'राष्ट्रीय गणित दिवस'; जाणून घ्या
या दिवशी महान गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला. त्यांचा वाढदिवस जगभरात 'गणित दिन' म्हणून साजरा केला जातो.
National Mathematics Day 2020: श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तिरोड-तंजावर येथे 22 डिसेंबर 1887 रोजी झाला होता. ते भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असत. त्यामुळे झोपेतही त्यांचा मेंदू केवळ गणिताचाचं विचार करत असे. परिणामी ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहत असतं. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत. हे प्रमेय आणि गणिती सिद्धान्त ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत असतं.
22 डिसेंबर हा दिवस भारतीय लोकांसाठी खूप गौरवशाली मानला जातो. या दिवशी महान गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला. त्यांचा वाढदिवस जगभरात 'गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी केवळ गणिताला वेगळी ओळख दिली नाही, तर असे बरेच प्रमेय आणि सूत्रेही दिली जी अजूनही फार उपयोगी मानली जातात. (हेही वाचा -Kisan Diwas 2020 Messages: किसान दिवस निमित्त बळीराजाबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes)
राष्ट्रीय गणित दिवस गणितांविषयी लोकांची आवड वाढवण्यासाठी साजरा केला जातो. सध्या तरुण पिढीला काहीतरी नवीन जाणून घ्यायचे आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची आवड निर्माण करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी गणिताचे शिक्षक आणि जाणकार विद्यार्थी गणिताची वैशिष्ट्ये सांगतात. शिक्षक आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की, विद्यार्थ्यांना शिकण्याची अधिक इच्छा आहे. अशा परिस्थितीत गणिताबद्दल रस निर्माण करणे आवश्यक आहे.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1911 साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त 23 वर्ष होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 1914 ते 1917 या अवघ्या 3 वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
दरम्यान, 1919 मध्ये रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष आजारपणात गेले. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी 27 एप्रिल 1920 रोजी रामानुजन या महान गणितज्ञाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे गणिविश्वाचे मोठे नुकसान झाले.