Narali Purnima 2020 Messages: नारळी पौर्णिमा निमित्त मराठमोळ्या Wishes, Images, WhatsApp Status शेअर करून कोळीबांधवाना द्या खास शुभेच्छा !

समुद्राशी निकटचा संबंध या कोळी बांधवांचाच येत असल्याने हा सण मोठया उत्साहाने कोळीवाडयांमधे साजरा होत असतो. होळी आणि नारळीपौर्णिमा हे दोन सण कोळीबांधवामध्ये अत्यंत महत्त्वाचे सण समजले जातात.

Narali Purnima 2020 Messages (PC - File Image)

Narali Purnima 2020 Messages: नारळी पौर्णिमेचा सण विशेषतः समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव साजरा करत असतात. समुद्राशी निकटचा संबंध या कोळी बांधवांचाच येत असल्याने हा सण मोठया उत्साहाने कोळीवाडयांमधे साजरा होत असतो. होळी आणि नारळीपौर्णिमा हे दोन सण कोळीबांधवामध्ये अत्यंत महत्त्वाचे सण समजले जातात.

श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे. त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदा 3 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमा निमित्त मराठमोळ्या Wishes, Images, WhatsApp Status शेअर करून कोळीबांधवाना खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - Friendship Day च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्रांसोबत Video Calling दरम्यान 'या' भन्नाट गोष्टी करुन द्या Surprise!)

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Narali Purnima 2020 Messages (PC - File Image)

दर्यासागर हाय आमचा राजा,

त्याचे जीवावर आम्ही करताव मजा,

नारले पुनवेला नारल सोन्याचा सगले,

मिलून मान देताव दरियाचा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Narali Purnima 2020 Messages (PC - File Images)

सन आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा,

मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Narali Purnima 2020 Messages (PC - File Images)

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,

कोकण म्हणजे निसर्गाचा थाट!

कोकण म्हणजे भरलेला पापलेट,

कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट!

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Narali Purnima 2020 Messages (PC - File Images)

कोळीवारा सारा सजलाय गो..!

कोळी यो नाखवा आयलाय गो !…

“मासळीचा दुष्काळ सरू दे,

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे’

सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Narali Purnima 2020 Messages (PC - File Images)

कोकण म्हणजे निळी खाडी,

कोकण म्हणजे माडाची झाडी!

कोकण म्हणजे सागराची गाज,

कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज!

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Narali Purnima 2020 Messages (PC - File Images)

नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारीक पध्दतीने साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव आपला पारंपारीक वेश परिधान करतात. कमरेला रूमाल अंगात टिशर्ट आणि डोक्याला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून अक्षरशः सोन्याने मढतात. या दिवशी नारळी पौर्णिमेच्या निमीत्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. अनेक कोळी पाडयांवर रावस माश्याचा तळलेला तुकडा देखील नैवेद्यामध्ये ठेवला जातो.