Nag Panchami Wishes In Marathi: नागपंचमीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, WhatsApp Status, Messages शेअर करत साजरा करा हा सण

नागाला देवत्व बहाल करून त्याच्याप्रती आदर व्यक्त करणे, हे केवळ धार्मिक कर्तव्य नसून पर्यावरण संवर्धनाचा एक सुंदर संदेशही आहे.

Nag Panchami Quotes in Marathi:  नागपंचमी (Nag Panchami) हा श्रावण महिन्यातला पहिला सण. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला येणार्‍या या सणापासून श्रावण महिन्यातील सणावारांना सुरूवात होते. निसर्गातील नाग देवतेची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. शेतकऱ्यांचे पीक उंदीर व इतर किडींपासून वाचवणाऱ्या नागाला या दिवशी दूध, लाह्या अर्पण करून पूजले जाते. मग अशा या खास सणाच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना नागपंचमीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes, Messages, Quotes शेअर करत देण्यासाठी खालील मेसेजेस, ग़्रीटिंग्स  डाऊनलोड करून शेअर करू शकता.

नागपंचमीच्या उत्सवामागे अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. महाभारतातील जनमेजय राजाच्या सर्पसत्र यज्ञाची कथा प्रसिद्ध आहे.तर शिवपुराणात नागांना भगवान शंकराचे आभूषण मानले गेले आहे. शिवशंकराच्या गळ्यातील नाग हे त्यांच्या भयमुक्ततेचे आणि सृष्टीवरील नियंत्रणाचे प्रतीक मानले जाते. नक्की वाचा:  Nag Panchami Date: 2026 मधील नागपंचमीची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या, पूजा विधी .

नागपंचमीच्या शुभेच्छा

श्रावणाच्या हिरवाईत सणाचा रंग खुलू दे,
नागदेवतेच्या कृपेने प्रत्येक घर आनंदाने भरू दे.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागदेवतेचा आशीर्वाद लाभो,
घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदो.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रद्धेने केलेली प्रार्थना फळाला येवो,
नागदेवतेच्या आशीर्वादाने प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
आपणास व आपल्या परिवारास
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागदेवतेची कृपादृष्टी सदैव
आपल्या परिवारावर राहो,
सुख, शांती, आरोग्य
आणि समृद्धीने जीवन बहरून जावो.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीच्या पवित्र पर्वावर
आपल्या कुटुंबावर नागदेवतेचा आशीर्वाद सदैव राहो,
घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नागपंचमी हा सण आपल्याला निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची आठवण करून देतो. मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर सहअस्तित्वाचे मूल्य या सणातून अधोरेखित होते. नागाला देवत्व बहाल करून त्याच्याप्रती आदर व्यक्त करणे, हे केवळ धार्मिक कर्तव्य नसून पर्यावरण संवर्धनाचा एक सुंदर संदेशही आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement