Nag Panchami 2019 Puja Muhurat: नाग पंचमी दिवशी दिवशी नागाची पूजा करणे का मानले जाते विषय, पहा यंदाचा शुभ मुहूर्त, विधी

या दिवशी अनेक स्त्रिया आणि नागाची पूजा करतात. यंदाची ही नागपंचमी ही तितकीच खास आहे.

Nag Panchami (Photo Credits: Instagram)

Nag Panchami 2019: श्रावण महिना सुरु झाला की,  श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami). महाराष्ट्रात यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्ट दिवशी नागपंचमी आणि श्रावणी सोमवार हा योगायोग जुळून आला आहे. भगवान शंकराला श्रावण मासातील आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे या भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असलेल्या नागालाही तितकेच विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून नागपंचमी ला नागाची पूजा विशेष मानली जाते. असं म्हणतात श्रावण महिना हा पावसाचा म्हणजेच वर्षा ऋतू असतो. ज्यामुळे भूगर्भातील नाग बाहेर भूतलावर येतात. त्यामुळे भूतलावरच्या लोकांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी ची पूजा केली जाते. श्रावणात नवविवाहित मुली आपल्या माहेरी जाण्याची प्रथा आहे. या दिवशी नवविवाहित तसेच विवाहित स्त्रिया साजश्रृंगार आणि रत्नजडित अलंकार परिधान करतात.  व मनोभावे नागाची पूजा करतात.

तसेच नागपंचमी दिवशी अनेक स्त्रिया तसेच मुली आपल्या लाडक्या भावासाठी उपवास ही करतात.  यंदाची ही नागपंचमी ही तितकीच खास आहे. Shravan Somvar 2019 Date: शिवभक्तांसाठी खास असलेल्या श्रावणी सोमवार व्रत यंदा चार दिवस; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?

नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला 365 दिवस उपयुक्‍त ठरतात.