Happy World Music Day 2019 Wishes: जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा म्युझिक डे!
यादिवसाचं औचित्य साधून जगभरातील संगीतप्रेमींना द्या शुभेच्छा
World Music Day 2019 Greetings in Marathi: संगीताची जादू ही अनेकांना भुरळ पाडणारी आहे. जगभरामध्ये त्याचे विविध प्रकार आहेत. भाषा, प्रकार, शास्त्र या सार्याच्या सीमा पार करून तुम्हांला आनंद देणारा प्रत्येक श्रवणीय प्रकार हा तितकाच महत्त्वाचा आहे. आज 21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन (World Music Day) म्हणून साजरा केला जातो. मूळची फ्रांसमधील ही संकल्पना आता जगभर पोहचली आहे. मग आजच्या या जागतिक दिनी तुमच्या मित्र परिवाराला संगीत दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करा.आनंद द्विगुणीत करा. World Music Day 2019: जागतिक संगीत दिन साजरी करण्याची प्रथा कशी आणि कुठून झाली?
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र
जागतिक संगीत दिनाच्या दिवशी ग्रिटींग्स शेअर करून तसेच तुमची आवडती गाणी शेअर करून देखील हा दिवस खास बनवा. संगीत हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून त्याचा सकारात्मक वापर केल्यास आरोग्यावर फायदेशीर परिणाम दिसून येतात. अनेक आजारांवर मात करण्यासाठी औषधोपचारांसोबत पर्यायी उपचारद्धती म्हणून संगीताचा वापर केला जातो.