Muharram 2020: इमाम हुसेन यांच्या हौताम्याच स्मरण मोहरम दरम्यान प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी मेसेजेस!

या महिन्यात इमाम हुसेन यांच्या हौताम्याचं स्मरण केले जाते.

Muharram 2020 | File Image

Muharram 2020 : मुस्लीम बांधवांच्या हिजरी कॅलेंडरमधील (Hijri Calendar) पहिला महिना म्हणजे मोहरम (Muharram). भारतामध्ये यंदा मोहरम महिन्याला सुरूवात गुरूवार, 20 ऑगस्ट पासून होणार आहे. मोहरम महिन्यात पहिल्या दहा दिवसांमध्ये जगभरात शिय्या (Shia)  आणि सुन्नी (Sunni) पंथातील मुस्लिम बांधव प्रार्थना करतात. या महिन्यात इमाम हुसेन यांच्या हौताम्याचं स्मरण केले जाते. मग यंदा मोहरम महिन्यात इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी तुमच्या नातलगांसोबत, मुसलमान मित्रमैत्रिणींसोबत मोहरमच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), इंस्टाग्राम रील्स, ट्वीटरच्या माध्यमातून लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे काही मेसेजेस शेअर करू शकता.

इस्लाम धर्मीयांच्या इतिहासामध्ये Battle of Karbala हा अत्यंत क्लेषकारक प्रसंग मानला जातो. या लढाईतच हुसेन यांना त्यांच्या साथीदारांसोबत हौतात्म्य आलं होतं. त्याची आठवण काढत मोहरमच्या पहिल्या 10 दिवसांत प्रार्थनांचं आयोजन शिया आणि काही सुन्नी पंथातील मुस्लीम बांधवांकडून केले जाते.

मोहरम साठी मेसेजेस

Muharram 2020 | File Image
Muharram 2020 | File Image
Muharram 2020 | File Image
Muharram 2020 | File Image
Muharram 2020 | File Image

दरम्यान यंदाच्या वर्षी भारतात कोरोना व्हायरसचं संकट असल्याने सणांवरही त्याच सावट पहायला मिळत आहे. मोहरमच्या निमित्ताने यंदा ताबुतांची मिरवणूक न काढण्याचं आवाहन देशाच्या विविध भागातील राज्य सरकारांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान भारतात यंदा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन आहे. नागरिकंना अनावश्यक गर्दी टाळून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif