Mother's Day 2023 Date: यंदा 14 मे रोजी साजरा होणार 'मदर्स डे'; जाणून घ्या 'मातृदिना'चे महत्व व या दिवसाच्या सेलिब्रेशनचा इतिहास

तर जाणून घेऊया नेमका या दिवसाचा इतिहास काय आहे.

Mothers Day (Photo Credit: File Photo)

आई प्रति असणारे आपले प्रेम, माया, आदर, भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे (Mother’s Day 2023). मातृदिन हा आईच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तिचा सन्मान केला जातो. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याच्या आईचे अमूल्य असे योगदान असते, हेच योगदान साजरे करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन.

साने गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर, ‘आई माझा गुरू, आई कल्पतरू, आईचे प्रेम आकाशाहून मोठे आणि सागराहूनही खोल आहे,’ ही आईची महती. या महतीचे गोडवे गाण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. मातृ दिन हा दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा म्हणजे 2023 मध्ये 14 मे जगभरात मातृ दिन साजरा होईल.

आपल्या पारंपरिक उत्सवाशी किंवा सणाशी मातृदिनाचा संबंध नसला तरी, फक्त आईवरील प्रेमाखातर हा दिवस जगभरात साजरा होतो. तर जाणून घेऊया नेमका या दिवसाचा इतिहास काय आहे.

मदर्स डे सुरू करण्याचे श्रेय अमेरिकेच्या Anna Jarvis यांना जाते.  Anna चा जन्म अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया येथे झाला होता. तिची आई ‘अॅना’ ही शाळेत शिक्षिका होती. आपल्या आईच्या निधनानंतर Anna व तिच्या काही मित्रांनी आईच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्याची मोहीमही सुरू झाली. (हेही वाचा: Mother's Day 2023 Gift Ideas: मदर्स डे निमित्त DIY ग्रीटिंग कार्ड्सपासून ते वेलनेस स्पा पॅकेजेसपर्यंत तुम्ही आपल्या आईला देऊ शकता 'या' 5 हटके भेटवस्तू!)

मदर्स डेच्या संस्थापिका Anna Jarvis यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ देशभरात मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. त्यानुसार, 1914 मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. त्यानंतर 8 मे 1914 रोजी अमेरिकेत पहिला मदर्स डे साजरा करण्यात आला, तेव्हापासून मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अमेरिका, भारत, न्यूझीलंड, कॅनडा आणि इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो, तर काही देशांमध्ये मार्च महिन्यात मदर्स डे साजरा केला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif