Mother's Day 2021: मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी Google ने Doodle द्वारे बनवले आईसाठी खास डिजिटल कार्ड
हा दिवस आईच्या कायम लक्षात राहण्यासाठी गुगलप्रमाणे तुम्हीही आपल्या आईसाठी काही खास गोष्टी करु शकता.
Mother's Day 2021 Google Doodle: आज संपूर्ण जगभरात मातृदिन (Mothers Day) साजरा केला जात आहे. मे महिन्याच्या दुस-या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. यंदा हा दिवस 9 मे रोजी म्हणजेच आज साजरा केला जात आहे. हा दिवस जगभरातील तमाम मातांना समर्पित केला आहे. म्हणूनच सर्च इंजिन गुगलने देखील आपल्या अनोख्या अंदाजात डूडलच्या माध्यमातून आईसाठी खास डिजिटल ग्रिटिंग कार्ड बनवले आहे. आजचा दिवस आईसाठी खास बनविण्यासाठी गुगलने हे डूडल बनवले आहे. हा दिवस आईच्या कायम लक्षात राहण्यासाठी गुगलप्रमाणे तुम्हीही आपल्या आईसाठी काही खास गोष्टी करु शकता.
गुगलने डूडलद्वारे एक पॉप अप कार्ड बनवले आहे. हे एक अॅनिमेटेड डूडल आहे. ज्यात अनेक रंगाचा वापर केला आहे. हे एक खास पद्धतीचे डिजिटल कार्ड आहे. यावर्षीचे गुगल डूडल कार्ड क्राफ्टचे उत्कृष्ट उदाहरण आहे.हेदेखील वाचा- Mother's Day 2021 Wishes in Marathi: मातृदिनाच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन आईविषयी व्यक्त करा कृतज्ञता!
डूडलच्या या डिजिटल कार्डच्या माध्यमातून तुम्ही जगातील कुठल्याही कोन्यातून आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. गुगल डूडल हे डिजिटल कार्ड बनविण्यासाठी तुमची मदत करु शकतो. डूडलवर राइट क्लिक केल्यावर आपल्याला सोशल मिडिया प्लेटफॉर्म फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप सारखे अनेक प्लॅटफॉर्म शेअर करण्याचा पर्याय मिळेल. कोरोना काळात आपल्या आईपासून दूर असलेल्या मुलांना या डिजिटल कार्डचा वापर करता येईल.
या डिजिटलमुळे अगदी काही वेळातच तुमच्यापासून कोसो दूर असलेल्या तुमच्या आईला डिजिटल कार्ड पाठवून खूश ठेवू शकता.