Mother’s Day 2019 Quotes and Messages: तुमच्या आयुष्यातील आईचे महत्त्व सांगणारे हे विचार शेअर करुन आईला द्या मातृदिनाच्या शुभेच्छा!
आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा देऊन तिचा दिवस खास करण्यासाठी थोरामोठ्यांचे सुंदर विचार, Quotes आणि Messages...
Happy Mother’s Day 2019: मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे 'जागतिक मातृदिन.' आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? यांसारखे प्रश्न, शंका दूर सारून आजकाल तरुणाई मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा करताना दिसते. आपल्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी गृहित धरतो आणि आईला तर अगदी हक्काने. त्यामुळे तिचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. तोच हा दिवस म्हणजे मदर्स डे.
आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मदर्स डे निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार...
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी - कवी यशवंत
न ऋण जन्मदेचे फिटे - मोरोपंत
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? - माधव ज्युलियन
आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही - ग. दि. माडगूळकर
देव जगात सगळीकडे राहू शकत नाही म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली.
व्हिडिओ:
आईबद्दलचे हे सुंदर विचार मनाला अगदी भिडतात. यंदा मदर्स डे निमित्त आईसोबत हे विचार शेअर करुन तिचा दिवस खास करा.