Mother Teresa 110th Birth Anniversary: मदर टेरेसा यांचे शांती, करूणा चे संदेश देणारे बहुमूल्य विचार!

या निमित्ताने मदर टेरेसा यांचे काही मोलाचे विचार जाणून घेऊन त्यांच्या विचारांचा वसा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करूया.

Mother Teresa sayings (Photo Credits: File Image)

मदर टेरेसा (Mother Teresa ) यांचा आज जन्मदिन आहे. 26 ऑगस्ट 1910 साली Anjezë Gonxhe Bojaxhiu म्हणून त्यांचा जन्म झाला. नंतर रोमन कॅथलिक चर्च द्वारा कलकत्ता मध्ये संत टेरेसा म्हणून त्यांना नावाजण्यात आले. मदर टेरेसा या एक रोमन कॅथलिक नन होत्या. 1949 साली त्यांनी स्वेच्छेने भारतीय नागरिकत्त्व स्वीकारलं होतं. त्या नेहमी पांढर्‍या साडीला निळा काठ असलेली शुभ्र साडी परिधान करत असतं, त्यांच्या गळ्यात क्रॉस असे. मात्र जात-पात धर्म भेद विसरून त्यांनी सार्‍यांवर माया केली. त्यांचा उल्लेख अनेकदा ममता आणि मानवता यांचं जीवंत उदाहरण असं केलं जात आहे. आज त्यांची 110 वी जयंती आहे. या निमित्ताने मदर टेरेसा यांचे काही मोलाचे विचार जाणून घेऊन त्यांच्या विचारांचा वसा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करूया.

दरम्यान मदर टेरेसा यांना भारत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न देऊन तसेच नोबेल शांतता पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे.

Mother Teresa sayings (Photo Credits: File Image)
Mother Teresa sayings (Photo Credits: File Image)
Mother Teresa sayings (Photo Credits: File Image)
Mother Teresa sayings (Photo Credits: File Image)
Mother Teresa sayings (Photo Credits: File Image)

भारतामध्ये गरीब मुलांना आधार देण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. दरम्यान गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्य सेवा मिळावी यासाठी त्यांनी 'निर्मला शिशू भवन, निर्मल हृद्य' सारख्या संस्था सुरू केल्या. मदर तेरेसा यांचं निधन 5 सप्टेंबर 1997 साली झाले.