Mom-To-Be Bipasha Basu ने केला नवीन व्हिडीओ पोस्ट, बॉडीकॉन ड्रेसमध्ये दाखवले बेबी बंप, पाहा अभिनेत्रीचा नवीन Look
बुधवारी, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ती तिचा बेबी बंप दाखवतांना दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Mom-To-Be Bipasha Basu's New Video: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच होणार आहे. बुधवारी, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ती तिचा बेबी बंप दाखवतांना दिसत आहे. कॅप्शन दिले की, "पाहा! #lovemybabybump #pregnantandconfident #lovemybody #loveyourself." व्हिडिओमध्ये, बिपाशा काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप दाखवत 'बघ माझ्या पोटात बाळ आहे' असे म्हणताना दिसत आहे. रील व्हिडिओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने मोहक व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच, चाहत्यांनी बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हरवर अभिनंदनाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. [हे देखील वाचा: Bipasha Basu Announces Pregnancy: Bipasha Basu आणि Karan Singh Grover लवकरच होणार आई-बाबा; बिपाशाने खास फोटो शेअर करत दिली गूड न्यूज!]
पाहा व्हिडीओ:
comment:
अभिनेता आर माधवनने प्रतिक्रिया दिली की , "व्वाव्वा. अभिनंदन... मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे.... यिपीईईईई..."
व्हिडीओवर प्रतिक्रिया देत करण सिंग ग्रोव्हरने लिहिले की , "हो बघ!!!! तुझ्या पोटात माझे बाळ!"
बिपाशा आणि करणने मंगळवारी अधिकृतपणे बिपाशा आई होणार असल्याची घोषणा केली होती. सोनम कपूर आणि आलिया भट्टनंतर अभिनेत्री बिपाशा बसू तिसरी अभिनेत्री बनली जी सध्या तिच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहे. बिपाशा आणि करण यांची पहिली भेट 2015 मध्ये भूषण पटेलच्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि एप्रिल 2016 मध्ये एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने मॅटर्निटी शूटसह बिपाशा आई होणार असल्याचे सांगितले होते.