Ashadhi Ekadashi 2019: विठू माऊलीचा गजर करणारी मराठी सिनेमातील ही '10' गाणी, तुम्हाला घेऊन जातील पंढरपुरी (Watch Video)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही मराठी चित्रपटातील 10 खास गाणी तुम्हाला पंढरपुरीच्या भक्तीमय वातावरणाचा अनुभव देऊन जातील
वारकरी सांप्रदायातली सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) , या दिवशी आळंदीहून ज्ञानेश्वरांची (Sant Dnyaneshwar) , देहू येथून तुकारामांची (Sant Tukaram), त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची (Nivruttinath) , पैठणहून एकनाथांची (Sant Eknath) , तर उत्तर भारतातून कबिराची (Sant Kabir) पालखी पंढरपुरी (Pandharpur) येते. साधारण 20 ते 21 दिवस पायी चालत येणारी लाखो वारकरी मंडळी सुद्धा यादिवशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढपुरात दाखल होतात, एकंदरीतच काय संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जातं, पण प्रत्येकालाच काही हा अनुभव याची देही याची डोळा घेणे शक्य होईल असे नाही, पण काळजी करू नका जरी तुम्हाला यंदा, पंढरपुरी जाऊन विठ्ठलाला पाहणे शक्य नसेल तरी तुम्ही या एकूण वातावरणाचा अनुभव घेऊ शकाल यासाठी आम्ही ही खास सोय केलेली आहे. Ashadhi Ekadashi 2019: 'आषाढी एकादशी' ला देवशयनी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या या दिवसाचे महत्व
पंढरपुरीच्या भक्तीमय वातावरणाचा अनुभव देणारी विठ्ठलाच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली ही काही मराठी चित्रपटातील गाणी तुम्ही ऐकायलाच हवीत...
1) माउली माउली (लय भारी)
2)माझी पंढरीची माय (माउली)
3)रखुमाई (पोश्टर गर्ल)
4)जय जय राम कृष्णा हरी (एक तारा)
5) पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदूंग (नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे)
6) गजर माऊलीचा (Impressive creation Group)
7) वार वार वारकरी (हरी ओम विठ्ठला)
8) बा विठ्ठला धाव पाव रे (हरी ओम विठ्ठला)
9)विठ्ठला विठ्ठला (विठ्ठल)
10)विठू माउली
अनेकदा चित्रपटांमधून आपल्याला प्रत्यक्ष शक्य नसलेल्या गोष्टी पाहायला मिळतात आणि आपण जरी ते करू शकणार नसलो तरी त्या पाहूनच मनाला आनंद होतो, त्याचप्रमाणे तुमच्या मनाला स्पर्श करून पंढरपूरच्या वातावरणाचा अनुभव देतील.