Matru Din 2019 Wishes (Photo Credits: File Image)

Matru Din 2019 Marathi Messages & Wishes: "नाम से बडा काम" या वाक्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आई. अवघ्या दोन शब्दाचे हे नाव प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्वाचे असते. कधी शिक्षक, कधी मार्गदर्शक, कधी मैत्रीण अशी प्रत्येकाची आपल्या आईसोबत केमिस्ट्री वेगवेगळी असली तरी यात प्रेमाचा अंश कायम असतो. या आईची महती आणि तिने आपल्यासाठी केलेली मेहनत शब्दात मांडणं तसं अशक्यच म्हणता येईल. पण मातृदिनाच्या दिवशी तुम्ही ही संधी हेरून आपल्या आईवरील प्रेम व्यक्त करू शकता. यंदा हिंदू कालदर्शिकेनुसार, आज म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी मातृदिन आहे. आजच्या दिवशी तुमच्या आईसोबत ही मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करत कृतज्ञता व्यक्त करा.

  • साऱ्या चुकांस आपल्या पोटात घेत जाई,

    देवासमान म्हणूनी असते मुलास आई

    मातृदिनाच्या शुभेच्छा

Matru Din 2019 Wishes

  • कधी चुकलो, कधी धडपडलो

    जिच्यापासून लपत नाही

    न बोलताही जाणून घेणे जमते तिज ती आई

    मातृदिनाच्या शुभेच्छा

Matru Din 2019 Wishes

  • पाऊल जेव्हा थकू लागते

    आधाराला देते हात

    अंधाराची छटा पसरता

    दिशा देणारी ठरते वात

    प्रेम जिचे संकटांवर हसतहसत करते मात

    अशा माझ्या माऊलीची सदैव राहूदे साथ

    मातृदिनाच्या शुभेच्छा

Matru Din 2019 Wishes

  • आत्मा आणि ईश्वर याचे मिलन म्हणजे आई

Matru Din 2019 Wishes

  • कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान

    म्हणजे आई ...

    विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान

    म्हणजे आई...

    मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Matru Din 2019 Wishes

GIFs ग्रिटिंग्स

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

खास व्हिडिओ

जागतिक स्तरावर हा दिवस मे महिन्यात साजरा करण्यात येत असला तरी हिंदू पंचांगानुसार आज मातृदिनाच्या मुहूर्त आहे. तारखांमध्ये तफावत आढळत असली तरी तुमच्या आईवरील प्रेमाला एका दिवसात बांधून न ठेवता तुम्ही अगदी रोज ही या टेक सॅव्ही माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करू शकता.