Martyrs’ Day 2020: 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचे कारण
त्यानंतर हा दिवस महात्मा गांधींच्या स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महात्मा गांधींना विशेष श्रद्धांजली वाहिली जाते.
Martyrs’ Day 2020 Importance: आपल्या भारत देशासाठी कित्येक क्रांतिवीरांनी प्राणांची आहुती दिली. त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान कायम स्मरणात राहावे असेच आहे. असेच देशसेवेसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देणारे, देशसेवेचा ध्यास लागलेले म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. गांधी जरी क्रांतिक्रारी नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण ही देशात क्रांती निर्माण करणारी नक्कीच होती. अहिंसेच्या मार्ग स्विकारणा-या या महापुरुषाची आज पुण्यतिथी. 30 जानेवारी 1948 रोजी क्रांतिकारी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली होती. त्यानंतर हा दिवस महात्मा गांधींच्या स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महात्मा गांधींना विशेष श्रद्धांजली वाहिली जाते.
नथुराम गोडसें नी गांधीजींची हत्या केल्या नंतर देशभरात या हत्येचे तीव्र पडसाद उमटले होते. यावेळी यात काही जण या हत्येच्या विरोधात होते तर काही समर्थनार्थ. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या 40 मिनिटे आधी पोहोचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद गांधी यांचा खून केला. गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे यांनी अजिबात प्रयत्न केला नाही. कारण त्यांना गांधींना नाही तर त्यांच्या आक्षेपार्ह विचारांना मारल्याचे समाधान होते. त्यामुळे त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली एकीकडे होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात दु:खाचा डोंगर कोसळला होता. म्हणून या दिवशी दरवर्षी राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, सुरक्षा मंत्री आणि सेनेचे प्रमुख राजघाटातील महात्मा गांधींजीच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतात.