IPL Auction 2025 Live

Margashirsha Guruvar Vrat Udyapan Vidhi: मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे उद्यापन यंदा चौथ्या की पाचव्या गुरूवारी? जाणून घ्या विधी आणि तारीख

11 जानेवारीला अमावस्या असल्याने अनेकींना शेवटचा गुरूवार कधी? असा प्रश्न पडला आहे.

Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi (Photo Credits: Youtube)

मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या (Margashirsha Guruvar) शेवटच्या गुरूवारी यंदा अमावस्या असल्याने नेमका उद्यापन विधी कधी करायचा? असा प्रश्न अनेकींना पडला आहे. काही जणी 11 जानेवारीला अमावस्या असल्याने आज 4 जानेवारीलाच शेवटचा गुरूवार करून उद्यापन (Udyapan) करणार आहेत तर काही जणी पाचव्या गुरूवारी म्हणजे 11 जानेवारीला उद्यापनाचा विधी करणार आहे. दरम्यान आनंद पिंपळकरांच्या सल्लानुसार, अमावस्या संध्याकाळी संपणार आहे. त्यामुळे ज्यांना अमावस्येनंतर उद्यापन करायचं आहे ते 11 जानेवारीच्या दिवशी देखील सवाष्ण भोजन आणि उद्यापनाचा विधी करू शकता. अमावस्या अशुभ नसते त्यामुळे यादिवशीही उद्यापन करण्यामध्ये काहीही हरकत नाही.  Margashirsha Guruvar 2022 Marathi Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारा देत खास करा आजचा दिवस! 

पहा आनंद पिंपळकर यांचा सल्ला

महालक्ष्मीव्रत उद्यापनाचे विधी काय?

दरम्यान मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शेवटच्या दिवशी सवाष्ण महिलेला महालक्ष्मीच्या रूपात मानून तिला हळदी कुंकू आणि वाण म्हणजेच भेटवस्तू दिली जाते. मसाले दूध दिले जाते. मार्गशीर्ष हा पवित्र महिना म्हणून पाळला जातो. दर गुरूवारी घरात घट बसवून त्याची विधिवत पूजा केली जाते. तसेच श्रावण महिन्याप्रमाणे या महिन्यातही मांसाहार टाळला जातो.