IPL Auction 2025 Live

Margashirsha Guruvar Vrat Puja 2020: मार्गशीर्ष गुरूवार दिवशी महालक्ष्मीचा घट आकर्षकरित्या असा सजवा (Watch Video)

तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार निमित्त महालक्ष्मी देवीचा घट कसा सजवावा

मार्गशीर्ष गुरुवार घट | (Photo Credits: Facebook)

Margashirsha Guruvar Mahalaxmi Puja 2020: 15 डिसेंबरपासून मराठी वर्षातील नववा महिना मार्गशीर्ष (Margashirsha) सुरु होत आहे. महालक्ष्मी व्रतामुळे (Mahalaxmi Guruvar Vrat) या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मराठी स्त्रिया लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी घट स्थापन करुन देवीची पूजा करतात. शेवटच्या गुरुवारी घटाची उत्तरपूजा केली जाते आणि व्रताची सांगता होते. महालक्ष्मीच्या पूजेमुळे घरात वैभव, ऐश्वर्य नांदते असे समजले जाते. तसंच मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळते. (Margashirsha Guruvar Vrat 2020 Dates: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची यंदा 17 डिसेंबर पासून सुरूवात; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!)

काही नवविवाहित महिला महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी उत्सुक असतात. तर काहीजणी व्रताची महती ऐकून पूजा करु इच्छितात. नव्याने महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्या प्रत्येकीला ही पूजा नेमकी कशी करावी, घट कसा सजवावा हा मोठा प्रश्न पडलेला असतो. व्रताची संपूर्ण माहिती असणाऱ्या महिला देखील यातून नवनव्या आयडियाज मिळू शकतात. तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार निमित्त महालक्ष्मी देवीचा घट कसा सजवावा... (Margashirsha Guruvar Vrat Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा नेमकी काय?)

पहा व्हिडिओज:

घट मांडण्यासाठी देवी मुकूट, कलश वस्त्र, दागिने अशा अनेक गोष्टी बाजारात अगदी सहज उपलब्ध आहेत. ती विकत आणून किंवा घरात असलेल्या वस्तूंपासून तुम्ही महालक्ष्मी देवीची घट सजवू शकतात. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा उत्साह सुहासिनींमध्ये असतो. पूजा, आरती, उपवास, नैवेद्य अशी साग्रसंगीत महालक्ष्मीची पूजा केली जाते. तसंच प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी देवीची पोती वाचली जाते. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन असते. त्यानिमित्ताने वाण देऊन सुहासिनी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम करतात.