Margashirsha Guruvar Marathi Vrat Katha: मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारी महालक्ष्मीची व्रत कथा इथे पहा संपूर्ण (Watch Video)

मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत करणार्‍या महिला या सकाळी घटाची मांडणी करून सकाळ- संध्याकाळ पूजेच्या वेळेस व्रत कथा वाचतात.

Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi (Photo Credits: Youtube)

Margashirsha Guruvar Mahalaxmi Vrat 2020:  15 डिसेंबर पासून मार्गशीर्ष मासारंभ झाला आहे. हिंदू धर्मियांमधील मराठी कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष हा मंगलमय महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत (Margashirsha Guruvar Mahalaxmi Vrat) करण्याची प्रथा आहे. घराघरामध्ये या दिवशी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीचं पूजन करून सुख, समाधान, समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. या महिन्यात दर गुरूवारी सकाळी घट मांडून सायंकाळी तिन्ही सांजेला तिचं पूजन करताना महालक्ष्मीची व्रत कथा वाचण्याची रीत आहे. तुम्ही व्रत करत असाल तर तुमच्या वाचण्यात कदाचित ही कथा नक्कीच आली असेल पण तुम्हांला घट मांडून हे व्रत करणं शक्य नसेल तरी ही महालक्ष्मीची व्रत कथा नेमकी काय आहे? याची उत्सुकता असेल तर ती नक्की एकून घ्या.

यंदा 17 डिसेंबर 2020 ला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरूवात आहे तर शेवटचा गुरूवार 7 जानेवारी 2021 ला आहे. या चारही गुरूवारी घटस्थापना करून दिवसभर उपवास करण्याची प्रथा आहे. Margashirsha Guruvar Vrat Puja 2020: मार्गशीर्ष गुरूवार दिवशी महालक्ष्मीचा घट आकर्षकरित्या असा सजवा (Watch Video).

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रत कथा

महालक्ष्मी घटाची मांडणी सकाळी स्नान करून केली जाते. त्यानंतर संध्याकाळी त्याची पूजा करण्याची, आरती करण्याची प्रथा आहे. उपवास असल्यास तो गुरूवारी संध्याकाळी सोडला जातो. या दिवशी संध्याकाळी जेवणात एखादा गोडाचा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. व्रताच्या दुसर्‍या दिवशी सकाळी (शुक्रवार) महालक्ष्मी व्रतासाठी मांडलेल्या घटातील पानं, फुलं निर्माल्यात टाकून कलशामधील पाणी तुळशीच्या रोपाला वाहतात. घटावरील नारळचा प्रसादामध्ये किंवा शाकाहारी जेवणात वापर करावा. या महिन्यात अनेक घरामध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो.