Marathi Bhasha Din 2022: 27 फेब्रुवारीलाचं का साजरा केला जातो मराठी भाषा दिन, जाणून घ्या
२७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. साहित्यिक कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते.
27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. साहित्यिक कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय संस्कृतचा प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा 'महाराष्ट्री' या बोलीभाषेपासून झ़ाला, असे मानले जाते की, पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते. इ.स. 1278 मध्ये म्हाइंभट यांनी लीळा चरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. 1290 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याच़ा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
कवी कुसुमाग्रज
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय 1999 वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करतात.
जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. 1974मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबर्या. 1964 मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.