Mangalagaur 2020 Ukhane: श्रावण महिन्यातील मंगळागौर पुजा, खेळ दरम्यान नाव घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी खास उखाणे
यंदा मंगळागौरी निमित्त तुमच्याकडे होणारा हा गोड हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही देखील सज्ज व्हायला पाहिजे.
Shravan 2020: महाराष्ट्रामध्ये आज (21 जुलै) पासून श्रावण महिन्याला (Shrvan Maas) सुरूवात झाली आहे. यंदा श्रावण मासारंभ आणि मंगळागौर पूजन पहिला वार असा योग जुळून आला आहे. दरम्यान नवविवाहित मुलींसाठी मंगळागौरीचा सण (Mangalaguri) विशेष असतो. श्रावण महिन्याच्या मंगळवारी पहिली पाच वर्ष हा सण साजरा करून आनंदी सहजीवनासाठी मंगळागौरीकाडे प्रार्थना केली जाते. त्यासाठी महिला, नातेवाईक एकत्र जमून रात्र जागवतात. महिलांचे अनेक खेळ, झिम्मा, फुगड्यांसह मंगळागौरीच्या खेळात प्रत्येकीला हमखास उखाणा (Ukhane) घेण्याचा हट्ट केला जातो. मग यंदा मंगळागौरी निमित्त तुमच्याकडे होणारा हा गोड हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही देखील सज्ज व्हायला पाहिजे. Mangalagaur 2020 Date: नवविवाहितांसाठी आनंदाची पर्वणी असणारी मंगळागौर यंदा कधी साजरी कराल? जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि विधी.
यंदा कोरोना संकट असल्याने सामुहिकरित्या आणि दरवर्षी प्रमाणे भव्य स्वरूपात मंगळागौरीचे पूजन होणार नाही. कार्यक्रमांची लयलूट नसेल पण घरच्या घरी तुम्ही मंगळागौर साजरी करणार असाल तर हे उखाणे नक्की लक्षात ठेवा,
मंगळागौर विशेष उखाणे
1. सर्वाना नमस्कारासाठी जोडते आता हात
----- चे नाव घेते पण सोडा माझी वाट
2. हे मंगळागौरी नमन करते तुला
----- चे अखंड सौभाग्य लाभू दे मला
3. पतिव्रता सीतेची, सावित्रीचा निग्रह
----- रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह
4. आंब्याच्या वनराईत कोळिळेचे गुंजन
... चे नाव घेऊन करते मी मंगळागौरीचे पूजन
5. यमुनेच्या काठी राधाकृष्णेचा खेळ
.... चे नाव घेते आज मंगळागौरीची वेळ
दरवर्षी कुमारिका, नवविवाहित महिला ते घरातील वरिष्ठ महिला एकत्र जमून मंगळागौरीचे खेळ खेळतात. पूर्वीच्या काळी महिलांना सर्रास घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. मात्र मंगळागौरीसारखे धार्मिक सण, व्रत वैकल्यांच्या माध्यमातून महिलांना एकत्र बाहेर पडून एकत्र जमण्याची, आपली सुख, दु:ख एकमेकींना सांगून मन हलकं करण्याची संधी मिळत असे. यामधील खेळ देखील त्याचीच झलक देतात.