Mangalagaur 2020 Messages & Wishes: मंगळागौरी व्रताच्या शुभेच्छा मराठी संदेश Whatsapp Status च्या माध्यमातून मैत्रिणींसोबत शेअर करून साजरा करा आनंद
आम्ही खास काही मराठी मंगळागौर शुभेच्छापत्र तयार केली आहेत ती आपण डाउनलोड करून Whatsapp Status, Instagram, Facebook वरून शेअर करू शकता.
Mangalagaur Marathi Messages: यंदा 21 जुलै पासून श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे यंदा मंगळवार पासून श्रावण महिना सुरु होत आहे. श्रावण आणि मंगळवार चं खास समीकरण असं की, दरवर्षी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी चे व्रत करून आनंद साजरा केला जातो. आईने मुलीला लग्नानंतर दिलेले सौभाग्य व्रत म्हणून लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे मंगळागौरीचे व्रत केले जाते. अखंड सौभाग्य व सासर-माहेरास सुखसमृद्धी लाभावी म्हणून नवविवाहित महिला हे व्रत करतात. या दिवशी पार्वती देवीची पूजा करुन जागरण केले जाते. जागरणात झिम्मा- फुगड्या, गाणी आणि अनेक पारंपारिक खेळ खेळले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जागरणाचे खेळ तर शक्य होणार नाहीत मात्र व्रत तुम्ही आवर्जून करू शकता. तसेच या दिवशी आपल्या ऑफिस मधील, ट्रेन मधील,आजूबाजूच्या, माहेरच्या, सर्व मैत्रिणींना शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांचाही आनंद द्विगुणित करू शकता. आम्ही खास काही मराठी मंगळागौर शुभेच्छापत्र तयार केली आहेत ती आपण डाउनलोड करून Whatsapp Status, Instagram, Facebook वरून शेअर करू शकता.
मंगळागौर मराठी शुभेच्छा
सोनपावलांनी गौरी आली घरी
मनोभावे करूयात तिचे पूजन
सणासाठी लॉकडाऊन मोडणार नाही
असं नक्की द्या मला वचन
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
झिम्मा फुगडी चा खेळ डिजिटली खेळू
सोशल डिस्टंसिंग पाळू आणि कोरोनाला टाळू
मंगळागौरी व्रताच्या खूप शुभेच्छा
श्रावणामुळे पसरली हिरवळ
सुंदर दिसे निसर्गाची किमया
मंगळागौरच खेळायची ना
मग ऑनलाईन जमुयात सर्व सया.
मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा
पावसाच्या रिमझिम सरींनी
चहूकडे दरवळला मातीचा सुवास
यंदा ऑनलाईन शुभेच्छा देऊन
साजरी करूयात मंगळागौर खास
मैत्रिणींनो, मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा
श्रावण मासी साधला ऊन पावसाचा सुंदर मेळ
यंदा सोशल डिस्टंसिंग पाळून खेळूया मंगळागौरीचे खेळ
पहिल्या मंगळागौर व्रताच्या सर्वांना शुभेच्छा
जागरणाचे खेळ खेळण्याची जर का तुम्हाला हौस असेल तर यंदा डिजिटली म्हणजेच गूगल मीट किंवा व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून हा खास बेत तुम्हालाही आखता येईल. दोनच दिवस शिल्लक असल्याने हे प्लांनिंग जरा लवकर करा, आणि हो या मराठमोळ्या शुभेच्छा तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.