How To Make Organic Colours at Home: यंदा होळीसाठी 'या' सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा सेंद्रिय रंग

हे नैसर्गिक रंग तुम्ही घरीही बनवू शकता. तुम्ही घरी होळीसाठी नैसर्गिक रंग कसे बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगजी सोप्या पद्धतीने तुम्ही घरातील काही साहित्यांचा वापर करून सेंद्रिय रंग तयार करू शकता.

Holi (Photo credit - Pixabay)

How To Make Organic Colours at Home: होळी (Holi 2024) हा रंगांचा सण आहे. देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंग (Colours) लावून हा सण साजरा करतात. या दिवशी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायने असतात. यामुळे त्वचा आणि केसांना नुकसान होते. त्यामुळे त्वचेवर पुरळ, ॲलर्जी येण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत तुम्ही काही नैसर्गिक रंग (Natural Color) वापरून होळी साजरी करू शकता. हे नैसर्गिक रंग (Organic Colours) तुम्ही घरीही बनवू शकता. तुम्ही घरी होळीसाठी नैसर्गिक रंग कसे बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगजी सोप्या पद्धतीने तुम्ही घरातील काही साहित्यांचा वापर करून सेंद्रिय रंग तयार करू शकता. (हेही वाचा -Holi Date 2024: होलिका दहन, धुलीवंदन आणि रंगपंचमीची तारीख आणि तिथी, जाणून घ्या)

'अशा' पद्धतीने होळीसाठी बनवा सेंद्रिय रंग -

डाळिंबाची साले पाण्यात उकळा. यामुळे तुम्हाला लाल रंगाचे पाणी मिळेल. याशिवाय तुम्ही लाल चंदन पावडरचा वापर कोरडा आणि ओला रंग बनवण्यासाठी वापरू शकता.