Makar Sankranti 2020: मकर संक्रांतीवेळी 'या' राशींच्या व्यक्तींना होणार लाभ

धार्मिक मान्यतानुसार सुर्य मकर राशीत प्रवेश करणार असल्याने संक्रांतीचा योग जुळून येतो. यंदा मकर संक्रांत येत्या 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Pixabay)

Makar Sankranti 2020: हिंदू धर्मातील मकर संक्रांत या दिवसाचे फार महत्व आहे. धार्मिक मान्यतानुसार सुर्य मकर राशीत प्रवेश करणार असल्याने संक्रांतीचा योग जुळून येतो. यंदा मकर संक्रांत येत्या 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. 14 जानेवारीला रात्री 2.08 वाजता सूर्य उत्तरायण करणार आहे म्हणजेच सुर्य त्याची चाल बदलून धनु मधून बाहेर येत मकर राशिमध्ये प्रवेश करणार आहे. मकर संक्रांती दरम्यान शुभवेळ सकाळी 7.52 वाजता ते संध्याकाळी 4.11 पर्यंत राहणार आहे.

मान्यतानुसार, दान केल्याने पुण्य लाभते असे म्हटले जाते. सनातन धर्मात मकर संक्रांतीला मोठे महत्व असून मोक्षचा मार्ग असल्याचे सांगितले जाते. या दिवसाला सुख आणि समृद्धिचा दिवस म्हणून ही मानले जाते. तर जाणून घ्या यंदाच्या मकर संक्रांतीच्या वेळी 'या' राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.(Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!)

>>मेष: ज्ञानात वाढ होईल

>>वृषभ: लाभ होईल पण भांडण होण्याची शक्यता

>>मिथुन: शुभ फळ मिळेल

>>कर्क: सुख-शांति लाभेल

>>सिंह: धन लाभ

>>कन्या: शारीरिक कष्ट

>>तुळ: व्यापारात लाभ

>>वृश्चिक: शांति लाभेल

>>धनु: सन्मान प्राप्ती

>>मकर: धन लाभ आणि सुख

>>मीन: असंतोष

जानेवारी महिन्यात हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे मकर संक्रांत मानला जातो. भोगी, मकर संक्रांत आणि क्रिक्रांत असे तीन दिवस हा सण साजरा केला जातो. यंदा 2020 हे ग्रेगेरियन कॅलेंडरचं वर्ष लीप इयर असल्याने मकरसंक्रांत 15 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे.