Maharashtra Day 2019: महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठमोठी गीते (Video)

तसेच देशाला आझादी मिळाल्यानंतर मध्य भारतातील मराठी भाषिकांचे राज्ये एकत्र आणून एक बनवण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र दिन (फोटो सौजन्य-फेसबुक)

Maharashtra Day 2019: 1 मे या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. तसेच देशाला आझादी मिळाल्यानंतर मध्य भारतातील मराठी भाषिकांचे राज्ये एकत्र आणून एक बनवण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. तर कोकण, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र त्याचसोबत विदर्भातील काही भाग जोडून संपूर्ण महाराष्ट्राची निर्मिती केली गेली.

गीतोपदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभिषेक करणार्‍या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल? संतांनी लोकगीतांपासून, ब्रह्मपदाचा मार्ग सांगणार्‍या विचारगर्भ अध्यात्मापर्यंत या मराठी भाषेचा मुक्त संचार सर्वत्र घडविला. महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। या शब्दात महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. तर महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठमोळी गीते. (Maharashtra Day 2019: महराष्ट्र राज्याचा स्थापन दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन, या बद्दल थोडक्यात जाणून घ्या)

महाराष्ट्र देशा

जय जय महाराष्ट्र 

महाराष्ट्र माझा

झकास महाराष्ट्र दिन सॉन्ग

मराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील, अशी केवळ अपेक्षाच नव्हे, तर खात्री मराठी जनतेला वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलियन यांनी शब्दबद्ध केले होते.