IPL Auction 2025 Live

Maha Shivratri 2020: महाशिवरात्री च्या दिवशी 'या' वस्तूंशिवाय अपूरी आहे भगवान शंकराची पूजा; पहा संपूर्ण सामुग्रीची यादी

या दिवशी भाविक उपवास करतात. भगवान शंकराची पूजा करतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करतात. या दिवशी बेलाचे पान, चंदन, धुप, दीप, भांग, धतूरा फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते.

महादेव (Photo Credit : File Image)

Maha Shivratri 2020 Puja Samagri: हिंदू धर्मामध्ये तसेच वारकरी संप्रादयामध्ये 'महाशिवरात्री'चा (Maha Shivratri) उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी भाविक उपवास करतात. भगवान शंकराची पूजा करतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करतात. या दिवशी बेलाचे पान, चंदन, धुप, दीप, भांग, धतूरा फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते.

प्रत्येक वर्षी माघ वद्य चतुर्दशीच्या दिवशी 'महाशिवरात्री' साजरी केली जाते. महाशिवरात्री म्हणजे 'शिवाची महान रात्र' होय. भारतात विविध ठिकाणी शंकराची भव्य मंदिरं असून त्या ठिकाणी पूजेसोबतच विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. यंदा 21 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवार महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भक्त शंकराला प्रसन्न करण्यासाठी मनोभावे पूजा करतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी खालील सामुग्रीने भगवान शंकराची पूजा करा. (हेही वाचा - Maha Shivratri 2020: महाशिवरात्रीला नक्की करा 'हे' पाच प्रभावी उपाय; दूर होतील समस्या, धन-संपतीमध्ये होईल वाढ)

महाशिवरात्रीच्या पूजा सामुग्रीची संपूर्ण यादी -

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी बेलाचे पान, चंदन, धुप, दीप, भांग, धतूरा, हळद, पाच प्रकारचे फुले, पांढरी मिठाई, गाईचं दूध, दही, मध, पवित्र गंगाजल, कापूर, वस्त्रभूषण, आदी सामुग्रीची आवश्यकता असते. या दिवशी भगवान शंकराला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात.(Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?)

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला अर्पण करा 'या' वस्तू -

गंगाजल-

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची गंगाजलाने पूजा करा. या दिवशी शंकराला गंगाजलाने अभिषेक घातल्यास ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. त्यामुळे या दिवशी पवित्र नदीच्या पाण्याने शंकराला अभिषेक घालावा.

भांग-

भगवान महादेवाला भांग प्रिय असल्याचे म्हटलं जातं. त्यामुळे महाशिवरात्रीला शंकराला भांगाची पाने अर्पण केली जातात. भांगाच्या पानांचे औषधी महत्त्व आहे. समुद्र मंथनावेळी शंकराने विष प्राशन केले होते. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी भांगाच्या पानाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भांगाचे विशेष महत्त्व आहे.

बिल्वपत्र (बेलाची पाने) -

पौराणिक कथेत बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. पौराणिक कथेनुसार, तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बेलाच्या पानात आहे, असे म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी बिल्व पत्राचा वापर केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. बेलाची पाने ही आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाची आहेत.

भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात? Watch Video 

धोत्र्याची पानं -

महाशिवरात्रीच्या शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ यांचा समावेश केला जातो. पौराणित कथांनुसार, शंकराला धोत्रा अत्यंत प्रिय आहे. धोत्र्याचे पान, फळ आणि फूल अत्यंत औषधी मानले गेले आहे. त्यामुळे या दिवशी शंकराला धोत्र्याची पाने नक्की अर्पण करा.