Maghi Ganesh Jayanti 2021 Invitations: माघी गणेश जयंती निमित्त घरी बाप्पाच्या दर्शनाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, HD Images
यंदा 15 फेब्रुवारी तुमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचं आगमन होणार असेल तर त्याच्या शुभाशिर्वाद घेण्यासाठी तुम्ही नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांना व्हॉट्सअॅप सह सोशल मीडिया मेसेजिंग अॅप वर आमंत्रण पाठवायला सुरूवात करू शकता.
Maghi Ganeshotsav 2021 Marathi Invitations Templets : माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) म्हणजेच श्री गणरायाचे जन्मदिवस (Lord Ganesh Birthday). यंदा हा सोहळा 15 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. दरम्यान माघी गणेश जयंती दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणे गणेश मूर्ती घराघरामध्ये स्थापन करण्याची पद्धत आहे. यंदा कोविड 19 संकटामुळे भाद्रपद गणेश चतुर्थी अत्यंत साधेपणाने साजरी झाली आहे. पण त्या दिवसांच्या तुलनेत कोविड 19 संकटावर आता बरंच नियंत्रण आल्याने तुम्ही माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा प्लॅन करत असाल तर आता आमंत्रण द्यायला सुरूवात करा. यंदा 15 फेब्रुवारी तुमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचं आगमन होणार असेल तर त्याच्या शुभाशिर्वाद घेण्यासाठी तुम्ही नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी यांना व्हॉट्सअॅप सह सोशल मीडिया मेसेजिंग अॅप वर आमंत्रण पाठवायला सुरूवात करू शकता. जर तुम्ही भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणेच आताही ही बाप्पाचं दर्शन ऑनलाईन ठेवणार असाल तर आमंत्रण पत्रिकेसोबत दर्शनाची ग्रुप लिंक, आरतीच्या वेळांसह बाप्पाच्या दर्शनाचीलिंक शेअर करायला विसरू नका. नक्की वाचा: Ganesh Jayanti 2021 Date: माघी गणेश जयंती यंदा 15 फेब्रुवारीला; जाणून घ्या गणेश भक्तांसाठी खास असलेल्या या दिवसाचं महत्त्व!
दरम्यान यंदा माघी गणेशोत्सव 2021 च्या पार्श्वभूमीवर आम्ही बनवलेली काही आमंत्रणपत्रिका, आमंत्रण पत्रिका नमुने यांचा वापर करून तुमचं निमंत्रण देखील बनवू शकता. सध्या अनेक व्यवहार अजूनही ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे जरी तुमच्याकडे काही नातेवाईक, मित्रमंडळी बाप्पाच्या दर्शनाला आले तर त्यांना नीट सॅनिटाईज करूनच घरात प्रवेश द्या. बाप्पाच्या समोर दिवा-बत्ती किंवा ज्वलनशील वस्तूंना हात लावताना ते सॅनिटायझरचा वापर केलेल्या हातांनी स्पर्श करणार नाहीत ना? याची खबरदारी घेत बाप्पाचा हा जन्मदिनाचा सोहळा आनंदामध्ये साजरा करा.
माघी गणेश जयंती 2021 आमंत्रणपत्रिका
*llश्री* *गणेशाय* *नम:ll*
सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता:
आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचं आगमन होणार आहे तरीही आपण सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 दिवशी सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी यावं ही विनंती.
विनित,
गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची देखील काही ठिकाणी पद्धत आहे. भाद्रपद गणेश चतुर्थीच्या गणेशोत्सवाप्रमाणे या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दीड दिवसांच्या सोहळ्यानंतर विसर्जन केले जाते. पूजा विधींमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तीळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते. गणेशभक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेश पूजन केले जाते.