Lunar Eclipse: पौर्णिमेला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ, कालवधी आणि सविस्तर माहिती
तरी या चंद्रग्रहणानंतर पुढील चंद्रग्रहण तब्बल पुढील ३ वर्षांनी म्हणजे 14 मार्च 2025 रोजी होणार आहे.
यावर्षी दिपोत्सवावर (Dipotsav) ग्रहणाची सावली पडली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण लक्ष्मीपूजनाच्या (Lacmi Pujan) दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी भारतात (India) खंडग्रास सुर्यग्रहण (Solar Eclips) झाले. तर आता लागलीच पुढील पौर्णिमेला म्हणजेच उद्या चंद्रग्रहण आहे. तरी या चंद्रग्रहणानंतर पुढील चंद्रग्रहण तब्बल पुढील ३ वर्षांनी म्हणजे 14 मार्च 2025 रोजी होणार आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण चंद्रग्रहण संपूर्ण उत्तर आणि मध्य अमेरिका आणि इक्वेडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुएला आणि पेरूच्या पश्चिम भागात दिसणार आहे. पोर्तो रिकोमध्ये, संपूर्णता सुरू झाल्यानंतर चंद्र मावळेल. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही दिसणार आहे. याव्यतिरिक्त, अलास्का आणि हवाईमधील लोकांना देखील ग्रहणाचा प्रत्येक टप्पा पाहण्याची संधी मिळणार आहे.
भारतात, संपूर्ण चंद्रग्रहण फक्त पूर्वेकडील भागांमध्ये दिसेल आणि आंशिक ग्रहण भारताच्या बहुतांश भागांतून दिसेल. कोहिमा, आगरतळा, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, सिलीगुडी, पाटणा आणि रांची या शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण पाहायला मिळेल तर दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, नागपूर, श्रीनगर, नोएडा, गुरुग्राम, चंदीगड, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे, जयपूर, लखनौ, मदुराई, उदयपूर, आणि भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागातील इतर शहरांमध्ये आंशिक चंद्रग्रहण पाहता येणार आहे. (हे ही वाचा:- Tulsi Vivah Mangalashtak: तुळसी विवाह निमित्त ऐका मराठी मंगलाष्टक, Watch Video)
भारतात चंद्रग्रहण चंद्रोदयाच्या वेळी सुरू होईल तर चंद्रास्तानंतर समाप्त होईल. संपूर्ण चंद्रग्रहण टप्प्याचा कालावधी 1 तास 24 मिनिटे असेल आणि आंशिक टप्पा 3 तास 38 मिनिटे असेल. पंचांगनुसार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 09 वाजून 36 मिनीटांनी ग्रहणाचे वेध सुरु होणार आहेत तर संध्याकाळी 06:18 वाजता ग्रहण संपणार आहे. हिंदू परंपरेनुसार ग्रहण वेध कालावधी आणि ग्रहणकाळ सुतक अशुभ काळ मानला जातो.