Laxmi Pujan 2020 Messages in Marathi: लक्ष्मी पूजनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन द्विगुणित करा सणाचा आनंद!
परंतु, सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप यावरुन शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, SMS, WhatsApp Stickers, Images, Greetings शेअर करुन तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
Laxmi Pujan Messages in Marathi: दिवाळीतील तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. धनतरेस, नरक चतुर्दशी आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन. काही वेळेस 'नरक चतुर्दशी' आणि 'लक्ष्मीपूजन' एकाच दिवशी येते. यंदाही 14 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीतील हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. दिवाळी हा सण संपूर्ण भारतवर्षात साजरा केला जात असून लक्ष्मीपूजना दिवशी घरोघरी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. घराबाहेर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात. त्यावर दिव्यांची आरास केली जाते. आकाशकंदील, विद्युत रोषणाई यामुळे सारा परिसर प्रकाशमय होतो. फटाक्यांची आतिषबाजी होते. मिठाई, फराळ यांची मेजवानी असते. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतात. सगळीकडे आनंदी आनंद असतो. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे सण साजरा करण्यावर काही बंधनं आली आहेत. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत आप्तेष्टांची भेट होईलच असे सांगता येत नाही. मात्र सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) यावरुन शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, SMS, WhatsApp Stickers, Images, Greetings शेअर करुन तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
दिवाळीतील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. लक्ष्मीची पूजा हे लक्ष्मीपूजनाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या दिवशी साग्रसंगीत अशी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या केरसुणीची देखील पूजा केली जाते. संपत्ती राखण्याची शिकवण देणाऱ्या कुबेरालाही पूजले जाते. जाणून घ्या लक्ष्मी पूजनाची पूजा नेमकी कशी कराल?
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा!
लक्ष्मी चा हात असो, सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो, आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळत राहो,
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या लक्ष्मीमातेला
लक्ष्मीपूजनाच्या अमाप शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे..
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!
लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ लक्ष्मी पूजन!
दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं,
देवी लक्ष्मीचं,
या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा!
सण समारंभ, विशेष दिन यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासह शेअर करा.
यंदाची दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करणार असलात तरी आपल्या कुटुंबियांसोबत साजरी करा. एकत्र फराळाचा आस्वाद घ्या. आनंदाची उधळण करा आणि सुरक्षित राहा.