Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी निमित्त मुंबईच्या लालबागचा राजा गणपती मंडळात आरोग्य उत्सवाला सुरुवात; रक्त आणि प्लाझ्मा दान कॅम्पचे आयोजन
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने गणेश चतुर्थी निमित्त श्रीगणरायाच्या मुर्तीची स्थापना न करता आरोग उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Ganpati Mandal) गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त श्रीगणरायाच्या मुर्तीची स्थापना न करता आरोग्य उत्सव (Arogya Utsav) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या आरोग्य उत्सवात रक्त आणि प्लाझ्मा डोनेशन कॅम्पचे (Blood And Plasma Donation Camp) आयोजन करण्यात आले आहे. या 11 दिवसांच्या अभियानाला मंडळ समितीने आरोग्य उत्सव असे नाव दिले आहे. कोरोना संकटात रक्त आणि प्लाझ्मा दान इतरांचे जीवन वाचवू शकतात. सध्याच्या कोविड-19 (Covid-19) संकटात त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवसाला पावणारा बाप्पा अशी लालबागच्या राजाच्या प्रचिती आहे. लालबागच्या राज्याचे दर्शन घेण्यासाठी दूरवरुन भाविक मुंबईत दाखल होतात. राज्याच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. लालबागच्या राजाची 18-20 फूट मुर्ती असते. मात्र यंदा गणेशोत्सव रद्द करण्यात आला असून आरोग्य उत्सवाला सुरुवात झाली आहे. (Ganesh Chaturthi 2020 निमित्त मुंबई, दिल्ली सह इतर गणेश मंदिरात गणरायाची पूजा संपन्न, Watch Videos)
ANI Tweet:
यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे संपूर्ण भारतभर गणेशोत्सव अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने काही विशेष नियम लागू केले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेने देखील गणेशोत्सवासाठी विशेष सूचना जारी केल्या होत्या. आता गणपती बाप्प्यांच्या विसर्जनासाठी देखील खास नियम लागू करण्यात आले आहेत.