Lalbaugcha Raja 2019 Live Darshan Online: लालबागच्या राजाचं घरबसल्या मोफत दर्शन घेण्यासाठी युट्युब, फेसबूक, ट्वीटर सह Android आणि iOS Mobile App च्या या लिंकवर क्लिक करा आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करा
यामध्ये सोशल मीडियातील अधिकृत वेबसाईट सह फेजबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्युब चॅनलवरही भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे.
Lalbaugcha Raja 2019: मुंबईमध्ये 'नवसाला पावणारा' गणपती म्हणून ओळख असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव 2019 साठी सज्ज झाला आहे. दरवर्षी भाविक तासन तास रांगेत उभे राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ 86 वं वर्ष साजरं करत आहे. या गणेश मंडळाला भाविकांची असणारी गर्दी पाहता आता त्याचं घरबसल्या लाईव्ह दर्शन, आरती पाहण्याची सोय मंडळाकडून करण्यात आली आहे. यामध्ये सोशल मीडियातील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळाची अधिकृत वेबसाईट सह फेजबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्युब चॅनलवरही भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. मग पहा तुम्ही घरबसल्या कसं आणि कुठे घेऊ शकता लालबागच्या राजचं दर्शन?
लालाबागचा राजा 2019 गणेशोत्सव लाईव्ह पाहण्यासाठी
लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पहाटे 4 वाजता पार पडल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासूनच त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नवसाची रांग आणि मुखदर्शनाची रांग अशा दोन विविध रांगांच्या माध्यमातून तुम्हांला थेट याची देहा याची डोळा गणपतीचं लोभस रूप पाहता येईल. पण तुम्हांला वेळ वाचवायचा असेल तर लालाबागचा राजा ऑनलाईन 24X7 मंडपातून थेट तुमच्या घरात पाहण्यासाठी खालील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भेट देऊ शकता. Lalbaugcha Raja 2019 LIVE Mukh Darshan Day 1: लालबागच्या राजाचं मुखदर्शन भाविकांसाठी खुलं; इथे पहा आरतीचं थेट प्रक्षेपण
- लालबागचा राजा फेसबूक पेज - facebook.com/LalbaugchaRaja
- लालबागचा राजा ट्विटर हॅन्डल- twitter.com/LalbaugchaRaja
- लालबागचा राजा अधिकृत वेबसाईट- lalbaugcharaja.com
- लालबागचा राजा Official Android App - https://bit.ly/2jNl7cK
- लालबागचा राजा Official iOS App for Apple Users - https://apple.co/2lEpM1c
- लालबागचा राजा युट्युब चॅनल - https://bit.ly/2lQpXH7
दरवर्षी सामान्यांसोबतच कला, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज हमखास लालबागच्या राजाला भेट देतात. यामध्ये बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यापसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते ठाकरे कुटुंबीय यांचा समावेश आहे.