Lakshmi Pujan 2024 Wishes In Marathi: लक्ष्मीपूजन निमित्त Greetings, Images, Messages द्वारे मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा!
तुम्ही देखील लक्ष्मी पूजनाच्या मराठी शुभेच्छा, लक्ष्मी पूजा कोट्स, लक्ष्मी पूजा एसएमएस, लक्ष्मीपूजन संदेश, लक्ष्मीपूजन मराठी स्टेटस शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.
Lakshmi Puja Wishes In Marathi: दिवाळी (Diwali 2024) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. लक्ष्मीपूजनाची (Lakshmi Pujan 2024) तयारी महिनाभर आधीच सुरू होते. यंदा दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या तारखांबाबत लोकांमध्ये मोठा संभ्रम होता. वास्तविक, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळीची पूजा सूर्यास्तानंतर म्हणजे प्रदोष काळात केली जाते. वैदिक कॅलेंडरनुसार, दिवाळी म्हणजेच कार्तिक महिन्याची अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3:52 वाजता सुरू होईल. तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:16 वाजता अमावस्या संपेल. पंचांगानुसार 31 ऑक्टोबरच्या रात्री अमावस्या तिथी असेल. यंदा 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन केले जाईल.
दिवाळीच्या पाच दिवसात लक्ष्मीपूजाचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. कारण, या दिवशी माता लक्ष्मीमातेची पूजा केली जाते. तसेच या दिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे घालून दिव्यांचा सण साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांना लक्ष्मीपूजन तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील लक्ष्मी पूजनाच्या मराठी शुभेच्छा, लक्ष्मी पूजा कोट्स, लक्ष्मी पूजा एसएमएस, लक्ष्मीपूजन संदेश, लक्ष्मीपूजन मराठी स्टेटस शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता. (Deepawali & Vastu Tips: कोणत्या दिशेला लक्ष्मी-गणेशाची स्थापना करून पूजा केल्याने होणार लाभ, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर
उघडेल भाग्याचं दार,
लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा.
उत्सव आला लक्ष्मीच्या कृपेचे,
मिळो तुम्हाला देवीचा आशिर्वाद,
लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मोठ्यांचा आशिर्वाद, मित्रांचं प्रेम,
सगळ्यांना शुभेच्छांनी देऊन सुरू करू
देवी लक्ष्मीची आराधना,
लक्ष्मीपूजनच्या शुभेच्छा
देवी लक्ष्मी घेऊन आली
दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या
इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय शुभेच्छा
तुमच्या घरी होवो धनाची बरसात
होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास
संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास
हॅपी दिवाळी...
लक्ष्मीपूजनच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा उत्तम मानली जाते. पूजेचे ठिकाण स्वच्छ करून पाटावर स्वस्तिक बनवावे. त्यानंतर एका भांड्यात भांड्यात ठेवा. पाटावर लाल रंगाचे कापड पसरून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. चित्रात देवी लक्ष्मी सोबत गणेशजी आणि कुबेर जी यांचेही चित्र असावे. त्यानंतर चित्र किंवा मूर्तीवर गंगाजल शिंपडून शुद्ध करा. त्यानंतर लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर यांना फुले, धूप, दिवा, अक्षत आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेनंतर भोग व प्रसाद अर्पण करावा. शेवटी देवी-देवतांची आरती करा. त्यानंतर संपूर्ण घर आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावा.