Janmashtami 2019 Wishes: जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा Greetings, WhatsApp Status, Messages, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा कृष्ण जन्मोत्सव
यंदा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 23 ऑगस्टच्या मध्यरात्री रात्री 12 वाजता हा जन्मष्टमीचा (Janmashtami) सोहळा रंगणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून कृष्ण भक्त मंदिरामध्ये आणि घरगुती स्वरूपात श्री कृष्णाचा जन्म दिवस साजरा करतात.
Krishna Janmashtami Wishes in Marathi: भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणजे श्रावण वद्य अष्टमीचा दिवस. यंदा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 23 ऑगस्टच्या मध्यरात्री रात्री 12 वाजता हा जन्मष्टमीचा (Janmashtami) सोहळा रंगणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून कृष्ण भक्त मंदिरामध्ये आणि घरगुती स्वरूपात श्री कृष्णाचा जन्म दिवस साजरा करतात. भगवतगीतेमध्ये त्याने केलेल्या उपदेशानुसार, पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा कृष्ण जन्म घेणार आहे. पुराणातील अख्यायिकेनुसार श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा आठवा अवतार असेदेखील समजले जाते. दरवर्षी जन्माष्टमीच्या रात्री बाळकृष्णाचा जन्मदिन साजरा केला जातो. मग या दिवसाच्या शुभेच्छा HD Images, Wishes, Greetings,SMS द्वारा फेसबूक आणि व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेजेसच्या द्वारा शेअर करून सेलिब्रेट करा यंदाचा जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचा सण Krishna Janmashtami 2019: श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा गोकुळाष्टमी चा उपवास, पूजा कधी कराल?
महाराष्ट्रात यंदा ओल्या दुष्काळाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपून काढलं आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील गोकुळांचा यंदाचा उत्साह थोडा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्तरावर साजरी केली जाणारी दहीहंडी यंदा मंदावली आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही यंदा जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचा सण साजरा करू शकता. मग यंदा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स आणि मेसेज शेअर करून आनंद द्विगुणित करा. Lord Krishna Quotes: भगवतगीता द्वारा श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटींग्स
व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स:
राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स:
कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स:
दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू आज गोकुळाष्टमीचा सण
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स:
गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स:
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
GIF Images
जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ मेसेज
भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये, मथुरेमध्ये हा सण मोठ्या उत्सहात साजारा केला जाणार आहे. या दिवशी लहाण मुलांना राधा- कृष्णाच्या वेशभूषेत सजवून हा सण साजरा करतात.