IPL Auction 2025 Live

Krishna Janmashtami 2019: भगवान श्रीकृष्णाच्या 'या' मंत्रांचा जप करा, दुर होतील आयुष्यातील समस्या

तसेच श्रीकृष्णाचे भक्त करोडोच्या संख्येने देभरात आहेत. त्याचसोबत श्रीकृष्णाची भारतात प्रसिद्ध मंदिरे सुद्धा पाहण्यासारखी आहे. मथुरा हे श्रीकृष्णाचे नंदनवन म्हणून ओखळले जाते.

Lord Krishna (Photo Credits-Twitter)

भगवान विष्णु यांचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाची महिमा संपूर्ण जगतात अगाध आहे. तसेच श्रीकृष्णाचे भक्त करोडोच्या संख्येने देभरात आहेत. त्याचसोबत श्रीकृष्णाची भारतात प्रसिद्ध मंदिरे सुद्धा पाहण्यासारखी आहे. मथुरा हे श्रीकृष्णाचे नंदनवन म्हणून ओखळले जाते.भगवान कृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार असल्याचं सांगितले जाते. धर्म रक्षण आणि दुर्जनांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी श्रीकृष्ण यांनी श्रावण वद्य अष्टमी दिवशी पृथ्वीतलावर जन्म घेतला अशी आख्यायिका आहे.

कृष्णाच्या आयुष्यासंबंधित अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आजही ऐकल्या तरी मन प्रसन्न होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाचे काही संबंधित मंत्र सांगणार आहोत. या मंत्रांचा जाप केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. मंत्रांचा उच्चारण हे योग्य पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार मंत्रांचा योग्य उच्चार केल्यास त्याचे फळ तुम्हाला आयुष्यात मिळते. तसेच या मुळमंत्रांचा जाप केल्यास घरात सुख-शांती लाभते. तर श्रीकृष्णाच्या 'या' मंत्रांचा जाप करा.(Krishna Janmashtami 2019: श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा गोकुळाष्टमी चा उपवास, पूजा कधी कराल?)

-ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा

-गोवल्लभाय स्वाहा

-गोकुल नाथाय नमः

-क्लीं ग्लौं क्लीं श्यामलांगाय नमः

-ॐ नमो भगवते श्रीगोविन्दाय

-लीलादंड गोपीजनसंसक्तदोर्दण्ड बालरूप मेघश्याम भगवन विष्णो स्वाहा

वरील मंत्रांचा नेहमी जाप केल्यास आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होईल. मात्र मंत्रांचा अयोग्य पद्धतीने तुम्हाला आयुष्यात फळ मिळणार नाही. गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा केला जातो. तर दुसर्‍या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर 24 ऑगस्ट दिवशी गोपाळकाला हा सण साजरा केला जाणार आहे.