Krishna Janmashtami 2019: श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा गोकुळाष्टमी चा उपवास, पूजा कधी कराल?

धर्म रक्षण आणि दुर्जनांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी श्रीकृष्ण यांनी श्रावण वद्य अष्टमी दिवशी पृथ्वीतलावर जन्म घेतला अशी आख्यायिका आहे.

Krishna Janmashtami (Photo Credits: YouTube)

श्रावण वद्य अष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. गोकुळाष्टमी (Gokulashtami)  किंवा श्री कृष्ण जन्माष्टमी  (Krishna Janmashtami 2019) म्हणून ओळखला जाणारा हा सण यंदा 23 ऑगस्ट दिवशी देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून मथुरेसह देशभरात तयारीला सुरूवात झाली आहे. गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा केला जातो. तर दुसर्‍या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर 24 ऑगस्ट दिवशी गोपाळकाला हा सण साजरा केला जाणार आहे.

भगवान कृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार असल्याचं सांगितले जाते. धर्म रक्षण आणि दुर्जनांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी श्रीकृष्ण यांनी श्रावण वद्य अष्टमी दिवशी पृथ्वीतलावर जन्म घेतला अशी आख्यायिका आहे. August 2019 Festivals Calendar: व्रतवैकल्य आणि सणावारांनी सजलेला असा ऑगस्ट महिना; पहा सणावारांची संपूर्ण यादी

गोकुळाष्टमी उपवास तारीख, वेळ

गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उशिरा काल्याचा प्रसादाचे वाटप केले जाते.

यंदा गोकुळाष्टमीचा उपवास 23 ऑगस्ट दिवशी केला जाणार आहे. तर पारणे 24 ऑगस्ट दिवशी असेल. जन्माची वेळ मध्यरात्री 12 असल्याने त्यावेळेस घरात, मंदिरांमध्ये पूजा केली जाईल.

गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी बांधून मानवी थरांच्या मदतीने ती फोडली जाते. मुंबई, पुणे, ठाणे शहरात या दिवशी ठिकठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन केलं जाते.