Bhaubeej 2023 Shubh Muhurat: आज भाऊबीज, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
असे म्हटले जाते की या दिवशी यमुनेने तिचा भाऊ यम याला तिच्या घरी बोलावले आणि त्याचे आदरातिथ्य केले. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी भावाचे औक्षण करणं अधिक फलदायी ठरतं. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा जाणून घेऊयात...
Bhaubeej 2023 Shubh Muhurat: भाऊ आणि बहिणीमधील स्नेह आणि प्रेमाचे प्रतीक असलेला भाईबीज (Bhaibeej 2023) हा सण यावर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेचं आज साजरा होत आहे. कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला भाऊबीज हा सण साजरा करण्याची परंपरा आहे, पाच दिवसांच्या दिव्यांच्या उत्सवाचा हा शेवटचा दिवस आहे. असे म्हटले जाते की या दिवशी यमुनेने तिचा भाऊ यम याला तिच्या घरी बोलावले आणि त्याचे आदरातिथ्य केले. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. या सणाला यम द्वितीया असेही म्हणतात.
या दिवशी भावाचे औक्षण करणं अधिक फलदायी ठरतं. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा जाणून घेऊयात...(हेही वाचा - Bhaubeej 2023 HD Images: भाऊबीज निमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे साजरा करा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण)
भाईबीज 2023 तारीख -
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल द्वितीया तिथी 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:36 पासून सुरू होईल आणि 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 01:47 पर्यंत चालू राहील. अशात भाईबीज हा सण 15 नोव्हेंबरला साजरा करण्यात येईल.
भाऊबीज औक्षण शुभ मुहूर्त -
15 नोव्हेंबर रोजी भावाला टिळक लावण्याची वेळ सकाळी 10.40 ते दुपारी 12 पर्यंत आहे.
भाऊबीज औक्षण पद्धत -
- भाई दूजच्या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी गेला. अशा स्थितीत भावांनी बहिणीच्या सासरच्या घरी जावे.
- तर अविवाहित मुलींनी आपल्या भावाचे तिलक घरीच करावे.
- भाऊ दूजच्या दिवशी सर्व प्रथम ध्यान करून गणेशाची पूजा करा.
- भावाचे तिलक करून भावाला नारळाचा गोळा द्यावा.
- भावाला गोड पदार्थ भरवा.
- त्यानंतर भावाने बहिणीकडून आशीर्वाद घेऊन तिला काही भेटवस्तू द्याव्यात.
भाईबीजेचे महत्त्व -
भाईबीज हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. भाईबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा तिलक आणि रोळी लावतात. यमुना नदीच्या काठावर भाऊ-बहिणीने बसून भोजन केल्यास जीवनात समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी आपल्या भावाला टिळक लावल्याने त्याला अकाली मृत्यूच्या भीतीला सामोरे जावे लागत नाही.