Karwa Chauth 2020 Moonrise Time Today: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये आज करवा चौथ व्रत करणार्‍या महिलांना कधी होणार चंद्र दर्शन!

त्यामुळे काही मिनिटांचा फरक आहे. दरम्यान आज रात्री मुंबई मध्ये चंद्र दर्शन रात्री 8 वाजून 52 च्या सुमारास होऊ शकतं. तर पुण्यात ही वेळ 8 वाजून 49 मिनिटांची आहे.

Happy Karva Chauth | File Image

Karwa Chauth 2020 Moonrise Time Today in Mumbai, Pune, Nashik, Nagpur: भारतामध्ये आज करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत करतात. दिवसभर निर्जळी उपवास करून रात्री चंद्राच्या साक्षीने पतीचं औक्षण करून दिवसभराचा पहिला घास घेतला जातो. त्यामुळे या करवा चौथचा उपवास करणार्‍या प्रत्येक जोडप्यासाठी या दिवसाची चंद्र दर्शनाची वेळ (Moonrise Time) महत्त्वाची असते. आज तुम्ही करवा चौथचं व्रत करत असाल आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये संध्याकाळी हे व्रत पूर्ण करणार असाल तर जाणून तुमच्यासाठी किती वाजता होऊ चंद्र दर्शन? Happy arwKa Chauth 2020 HD Images: करवा चौथ निमित्त पतीराजांना शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greetings आणि शुभेच्छापत्रं!

चंद्र दर्शनाची वेळ ही प्रत्येक शहरागणिक वेगवेगळी असते. त्यामुळे काही मिनिटांचा फरक आहे. दरम्यान आज रात्री मुंबई मध्ये चंद्र दर्शन रात्री 8 वाजून 52 च्या सुमारास होऊ शकतं. तर पुण्यात ही वेळ8 वाजून 49 मिनिटांची आहे. नाशिक मध्ये 8 वाजून 46 मिनिटांनी चंद्रदर्शन होणार आहे. तर नागपूर मध्ये 20 वाजून 19 मिनिटांच्या सुमारास चंद्र दर्शन होण्याची शक्यता आहे. Karwa Chauth 2020 : जर तुम्ही पहिल्यांदाच करवा चौथचे व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

करवा चौथच्या व्रतादिवशी चंद्र दर्शन न झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. पाटावर लाल कापड ठेवून त्यावर तांदळाने चंद्राची प्रतिकृती बनवा. यानंतर 'ओम चतुर्थ चंद्राय नम:' चा जप करा. चंद्र देवतेची पूजा करून तुम्ही नेहमीप्रमाणे करवा चौथचे इतर विधी करू शकता.

करवा चौथ दिवशी 16 शृंगार करून महिला पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. यामध्ये त्या माता पार्वती, शिव शंकर, गणपती आणि कार्तिकेयची देखील पूजा करतात. रात्री चंद्राला अर्ध्य अर्पण करून त्याची पुजा करण्याची प्रथा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif